Tuesday, September 17, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडचर्चा तर होणारच,ये क्या हो रहा है ,भाई..एकाच नावाचे दोन पक्ष ,...

चर्चा तर होणारच,ये क्या हो रहा है ,भाई..एकाच नावाचे दोन पक्ष , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल कार्यकर्ते संभ्रमित !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कोरोना नंतरच्या काळात राज्यात खूप मोठ्या राजकीय घडामोडी झाल्याने शिवसेना पक्षाचे दोन पक्ष झाले . त्यासाठी शिवसेनेला राजकीय तसेच निवडणूक आयोग व कोर्टाची परीक्षा द्यावी लागली .त्यानंतरच एका नावाचे दोन पक्ष असू शकत नाहीत म्हणून पक्षाच्या नावात बदल करण्यात आला . तीच परिस्थिती आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची झाली आहे.
एक महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित दादा पवार यांनी वेगळा गट स्थापन करून शिवसेना – भाजप सरकारमध्ये सामील झाल्याने ते आता उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झाले आहेत . त्यामुळे महाराष्ट्रात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ( अजित दादा पवार गट ) स्थापन करून नवीन पक्ष कमिटी स्थापन करण्याचा धडाका सुरू केला आहे . राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा व राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब हे असताना आता एकाच नावाचे दोन पक्ष स्थापन झाल्याने त्यांची अद्यापी निवडणूक आयोग , कोर्ट कचेरी व राजकीय परीक्षा बाकी असल्याने नक्की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा ? हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे . त्यामुळे या सर्व घडामोडीत कायदा कुठे आहे की नाही , घटनेचे पालन होत आहे की नाही , याची चर्चा मात्र सर्वत्र होत असताना दिसत आहे.

रायगड जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे . येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार तथा राष्ट्रीय सरचिटणीस असलेले व राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब यांचे खास असणारे सुनील तटकरे यांनी नुकताच अजित दादा पवार यांना सहकार्य करत त्यांच्या गटात सामील झाले आहेत व आता ते महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहेत . रायगडात यापूर्वी रोहा – माणगाव व कर्जत – खालापूर या दोन ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार होते . मात्र कर्जत – खालापूर च्या जागेवर पराभव झाल्याने यावेळी एकच आमदार असला तरी खासदार सुनील तटकरे यांचे विशेष लक्ष हे कर्जत – खालापूर मतदार संघावर असते.
कर्जत – खालापूर मतदार संघाचे माजी आमदार सुरेश भाऊ लाड हे पूर्वी खासदार सुनील तटकरे यांचे जिवलग मित्र तथा तटकरे हे सुरेश भाऊ लाड यांचे राजकीय गुरू होते . मात्र २०१९ मध्ये सुरेश भाऊ लाड यांचा झालेल्या पराभवात अनेक कारणे दडलेली असल्याने गुरू – शिष्याचे आता बिनसल्याचे चित्र संपूर्ण रायगडात माहित असल्याने आता कर्जत – खालापूर मतदार संघात राजिप चे माजी उपाध्यक्ष तथा शिक्षण – आरोग्य – क्रिडा सभापती सुधाकर शेठ घारे यांच्याकडे खासदार सुनील तटकरे यांनी नेतृत्वाची धुरा दिल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली अजित दादा पवार यांच्या गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नवीन कमिटी जाहीर करण्यात येत आहे.

मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नक्की कुठला गट अधिकृत आहे , राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब की , अजित दादा पवार गट हे अद्यापी सिद्ध झाले नसल्याने एका नावाचे दोन पक्ष अस्तित्वात असू शकतं नाहीत , असे निवडणूक आयोगाचा कायदा असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर अद्यापी प्रश्नचिन्हांची ” टांगती तलवार ” असल्याने , आता होत असलेल्या रायगड जिल्ह्याच्या नव्याने अजित दादा पवार गटाच्या पक्ष कमिट्या व जिल्हा नियोजन मंडळा वरील नियुक्त्या अधिकृत की अनाधिकृत , हे कोडे नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरत आहेत. म्हणूनच कुठलीही राजकीय , निवडणूक आयोग व कोर्टाची लढाई झाली नसल्याने या राज्यात कायदा अस्तित्वात आहे की , नाही ? एकाच नावाचे दोन पक्ष कसे ,त्याला निवडणूक आयोगाने मान्यता दिली का ? असे प्रश्न सध्या गुलदस्त्यात बंद असून ” राष्ट्रवादी काँगेस पक्ष ” नक्की कुणाच्या मालकीचा ? यामुळे कर्जतमध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उमटलेले दिसून येत असून कर्जत – खालापूर मतदार संघात कार्यकर्ते संभ्रमित झाल्याचे चित्र दिसत आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page