लोणावळा : शासनातर्फे घेतल्या जाणाऱ्या चित्रकला ग्रेड परीक्षा म्हणजेच एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षेसाठी लोणावळा विभागांमधून मोठया प्रमाणात विद्यार्थ्यांचा प्रतिसाद पाहावयास मिळाला.
लोणावळा परिसरामध्ये वेगवेगळ्या केंद्रावर चित्रकला ग्रेड परीक्षा घेण्यात आली. व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू.मेहता कनिष्ठ महाविद्यालयात 19 शाळेमधील 1052 विद्यार्थी बसले. एलिमेंटरी परीक्षेसाठी 642 इंटरमिजिएट परीक्षेसाठी 510 विद्यार्थी बसले.
व्ही.पी.एस हायस्कूल केंद्रावरती विद्यार्थी संख्या जास्त असल्यामुळे एकूणच चोख व्यवस्था करण्यात आलेली होती. केंद्राचे केंद्र संचालक म्हणून प्रशालेचे प्राचार्य श्री.उदय महिंद्रकर यांच्या नेतृत्वाखाली परीक्षा पार पडली. केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.महेश चोणगे आणि त्यांचे सहकारी शिक्षक श्री.चंद्रकांत जोशी, श्री.योगेश कोठावदे आणि श्री.विक्रम शिंदे यांनी मिळून उत्तम नियोजन केले.
परीक्षेसाठी तंत्रस्नेही वरिष्ठ लिपिक श्री.कुंडलिक आंबेकर, श्री.सचिन थोरात, श्री.निलेश ढाकोळ आणि श्री.संजय राऊत यांनी सहकार्य केले तर इतर साहित्याची जमवाजमव श्री.मुकुंद जगताप, श्री.सचिन गवळी आणि श्री.मयूर पवार यांनी केली.शाळा समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर आणि प्राचार्य श्री.उदय महेंद्रकर (केंद्र संचालक) यांनी श्री.महेश चोणगे (केंद्रप्रमुख) आणि त्याच्या सर्व टीमला परीक्षेविषयी मार्गदर्शक सूचना दिल्या. तसेच विद्यार्थी आणि पालक यांची गैरसोय कशी टाळता येईल यासाठी खास प्रयत्न करण्यास सांगितले. उपप्राचार्य श्री.आदिनाथ दहिफळे, उपमुख्याध्यापक श्री.सुहास विसाळ, पर्यवेक्षक श्री.विजय रसाळ, श्री.श्रीनिवास गजेंद्रगडकर आणि पर्यवेक्षिका श्रीमती क्षमा देशपांडे यांनी परीक्षेसाठी पर्यवेक्षक उपलब्ध करून दिले.
विद्यार्थी व पालकांसाठी मुख्य इमारतीच्या दर्शनी भागांमध्ये फलकावर विद्यार्थ्यांचे नंबर लावून विद्यार्थ्यांचा क्रमांक आणि वर्गखोल्या याची माहिती नमूद करण्यात आली होती. तसेच विद्यार्थ्यांसाठी शुद्ध पाण्याची सुविधा करण्यात आली. सकाळ विभागातील पेपर सुरू होण्याआधी सर्व विद्यार्थ्यांना मैदानावर एकत्रित करून मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आणि त्यानंतर वेळेवर परीक्षा सुरू करण्यात आली.