Sunday, December 22, 2024
Homeपुणेमावळचिपळूण येथील पूरग्रस्तांसाठी कार्ला येथून जीवनावश्यक वस्तूंची मदत रवाना...

चिपळूण येथील पूरग्रस्तांसाठी कार्ला येथून जीवनावश्यक वस्तूंची मदत रवाना…

कार्ला : कार्ला अडानेश्वर भक्त,भटकंती सह्याद्रीची ट्रॅकर्स मावळ व सिटी फंड कार्ला शाखेच्या वतीने एक हात मदतीचा या अंतर्गत चिपळूण येथील पूरग्रस्तांसाठी एक छोटीशी मदत म्हणून जीवनावश्यक वस्तू रवाना करण्यात आल्या.
राज्यात अतिवृष्टीमूळे जनजीवन विस्कळीत झाले आहे तर अनेक कुटुंब पुरामुळे उध्वस्त झाली आहेत.

अशाच पूर आलेल्या चिपळूण येथील पूरग्रसतांना मावळातून अनेक सेवाभावी संस्था व काही सामाजिक संस्थांकडून वेगवेगळ्या पूरग्रस्त गावांना जीवनावश्यक वस्तू पाठवून तेथील जनजीवनास मदत केली आहे त्याच प्रमाणे मावळातील भटकंती सह्याद्री ट्रॅकर्स, अडानेश्वर भक्त व सिटी फंड कार्ला शाखेच्या वतीने आपण समाजाचे काही देणे लागतो यानुसार एक हात मदतीचा अंतर्गत चिपळूण येथील पूरग्रस्तांसाठी छोटीशी मदत म्हणून जीवनावश्यक वस्तू रवाना करण्यात आल्या आहेत.

सदर मदतकार्यास सचिव संघटनेचे अध्यक्ष गणपत भानुसघरे, ग्राम विकास सदस्य दत्ता केदारी,सिटी फंड कार्ला शाखेचे संचालक संजय मोरे, सदस्य भरत साठे(सचिव संघटना ),सदस्य संभाजी केदारी(सचिव संघटना ), पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्यवस्थापक जयवंत विश्वासराव यांच्या विशेष प्रयत्नातून खूप मोलाचे योगदान लाभले आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page