if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
लोणावळा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून लोणावळा शहराच्या माध्यवर्ती असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज अश्वरूढ स्मारकाच्या सुशोभीकरणाचे भूमी पूजन आमदार सुनील शेळके यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.मागील अनेक वर्ष लोणावळा शहरातील नागरिक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरण कामाची मागणी करत होते. मात्र तांत्रिक अडचणीत सापडलेले हे काम अखेर आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून मार्गी लागले आहे.
या कामासाठी लागणारी तांत्रिक मंजुरी व कामासाठी 3 कोटी 14 लाख रुपयांचा निधी आमदार शेळके यांनी उपलब्ध करून दिला आहे. आज छत्रपती शिवाजी महाराज जन्म सोहळ्याच्या दिवशी या कामाचे भूमिपूजन तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नवीन अर्ध पुतळा उभारणी करण्याचे भूमिपूजन मावळचे जनसेवक आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी लोणावळा शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विलास बडेकर,काँगेस आयचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड, भाजपा शहराध्यक्ष अरुण लाड,शिवसेना शहरप्रमुख बाळासाहेब फाटक,मनसे शहराध्यक्ष भारत चिकणे, माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव,माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, शिवसेना पुणे जिल्हा संघटक मच्छिंद्र खराडे, महिला संघटक शादन चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस मंजुश्री वाघ, ब्रिंद्रा गणात्रा, काँग्रेसचे प्रदेश सचिव निखिल कवीश्वर, शिवसेना तालुकप्रमुख आशिष ठोंबरे,लोणावळा जागरूक नागरिकचे बाळासाहेब पायगुडे, किरण गायकवाड, नंदकुमार वाळंज,नासीर शेख, उमेश तारे, संजय गायकवाड,जितेंद्र कल्याणजी, भरत हारपुडे, विनोद होगले,नारायण पाळेकर, साहेबराव टकले,राष्ट्रवादीचे नेते दीपक हुलावळे, भरत येवले, बाळासाहेब भानुसघरे, राजू बोराटी, बाळासाहेब शिर्के, धनंजय काळोखे, अविनाश ढमढेरे, हरिष कोकरे, संतोष राऊत, किरण हुलावळे, सुरेश कडू, सनी पाळेकर, जाकिर खलिफा, सोमनाथ बोबाटे, उदय बोबाटे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी केले तर सूत्रसंचालन बाळासाहेब पायगुडे यांनी केले. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष विलास बडेकर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. यावेळी या कामाचे संकल्पचित्र तयार करणारे वास्तुविशारद गौरव भांगरे यांचा देखील सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार सुनील शेळके म्हणाले लोणावळ्यातील नागरिकांचा जिव्हाळ्याचा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरणाचा व आण्णाभाऊ साठे अर्ध पुतळा उभारणी कामाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी लोणावळ्यात सर्व राजकीय पक्ष एकत्र येतात हे उदाहरण उद्या मावळच्या विकासासाठी पतदर्शी ठरणार आहे.तालुक्याच्या विकासासाठी देखील असेच सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन त्यांनी केले. सर्वधर्म समभाव जपत लोणावळ्यात सर्व नागरिक एकत्र नांदत आहे.
महापुरुष व त्यांचे विचार उद्याच्या पिढीला समजले पाहिजे याकरिता पुतळे होणे गरजेचे आहे.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती 1 ऑगस्ट रोजी आहे तोपर्यंत हे काम पूर्ण व्हायला हवे. ज्याला काम घ्यायचे असेल त्यांनी घ्या पण हा निर्धार करून घ्या असे त्यांनी सूचित केले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरण काम करण्याची धमक ज्याची असेल त्यांनी काम घ्यावे व 19 फेब्रुवारी 2025 ला काम पूर्ण व्हायला हवं असं ठणकावून सांगितले. पुढील 100 वर्ष दिसेल असे दर्जेदार काम करा. मी निधी द्यायला कमी पडलो नाही आता तुम्ही कमी पडू नका. कोठेही दिरंगाई व दर्जा कमी होऊ देऊ नका. लागला तर आजुन निधी देईल पण काम दर्जेदार करा. आज सर्व पक्षीय मंडळी शहरातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी एका व्यासपीठावर आली हे पाहून मनाला समाधान वाटले असे सांगितले.
राजकारणाच्या पलिकडे जाऊन जनतेची कामे व विकासकामे मार्गी लावण्यासाठी सर्वांनी असेच एकत्र यावे असे आवाहन त्यांनी केले. यापुढील काळात भाजी मंडई, रेल्वे उड्डाणपूल, रोप वे, खंडाळा तलाव बोटिंग क्लब प्रकल्प, वलवण तलावाचे काम ही कामे मार्गी लावायची असल्याचे त्यांनी सांगितले.येत्या सहा महिन्यांत लोणावळ्यातील रुग्णालयाचे काम पूर्ण करण्याचा माझा मानस आहे. हे रुग्णालय उभे करताना खूप अडचणी आल्या. मात्र सर्व मंजुऱ्या घेऊन काम पूर्णत्वास येत आहे. दोन टप्पे पार पडले तिसरा टप्पा पूर्ण होईल.
येथे रुग्णाला 1 रूपयांपेक्षा जास्त खर्च येणार नाही. हे काम पूर्ण करण्यासाठी सर्वांनी पाठीशी रहा, रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णवाहिकेसाठी रस्ता मोकळा करून द्या. तो पर्यंत काम पुढे सरकणार नाही. त्यामुळे तेथील अडचण सोडवा. जे कोणी अडचण उभी करत आहेत, त्यांना सांगा व रस्ता मोकळा करून द्या असे आवाहन त्यांनी व्यासपीठावर बसलेल्या लोणावळ्यातील सर्व मान्यवरांना केले.