लोणावळा-खंडाळा – अपघातामुळे १७ वर्षीय सागर कुमार देवकुळे याला श्वास घेण्यात तीव्र अडचणी येऊ लागल्या. परिस्थिती इतकी गंभीर होती की तो सतत ऑक्सिजन सपोर्टवर होता. डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला, मात्र शस्त्रक्रियेचा खर्च तब्बल सहा लाख रुपये असल्याने कुटुंब आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडले होते.
जनसेवक शौकत भाई शेख यांनी परिस्थितीची जाणीव होताच त्वरित मदतीचा हात पुढे केला. त्यांच्या स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून सायन हॉस्पिटल, मुंबई येथे दि. २२ जानेवारी २०२५ रोजी सागरची शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आली. ही शस्त्रक्रिया यशस्वी ठरली असून आता सागर व्यवस्थित श्वास घेऊ शकतो.
शौकत भाई शेख यांनी यापूर्वीही अनेक गरजू रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया करून दिली असून, त्यांच्या सामाजिक कार्यामुळे अनेकांना जीवदान मिळाले आहे. त्यांच्या या कार्यामुळे ते लोणावळा-खंडाळा परिसरातील जनतेसाठी एक आधारस्तंभ ठरत आहेत.
सागरचे वडील कुमार शिवाजी देवकुळे यांनी मंत्री नितेशजी राणे, मेडिकल हेड झाहिद भाई खान आणि शौकत भाई शेख यांचे मनःपूर्वक आभार मानले. “शौकत भाई शेख यांच्या रूपाने आम्हाला देवदूतच लाभले,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. समाजातील प्रत्येक गरजू व्यक्तीला अशीच मदत मिळावी आणि शौकत भाई शेख यांचे सामाजिक कार्य असेच पुढे सुरू राहो, अशी प्रार्थनाही त्यांनी केली.