if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
मुळशी : आंबवणे येथे पुणे ग्रामीण पोस्ट विभाग पुणे. यांच्या केंद्र सरकार च्या विविध विमा पॉलिसी, आधार संबधित कामे व इतर योजना ग्रामीण व दुर्गम भागात प्रथमच डाक चौपाल चे आयोजन करण्यात आले. आंबवणे येथील जाई वात्सल्य फाउंडेशन पुणे. यांच्या वतीने जेष्ठ समाजसेवक नंदकुमार वाळंज यांच्या वाढदिवसाच्या निमित्त अतिशय स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. आंबवणे च्या परिसरातील 300 व्यक्तीसाठी सलग पाच वर्षासाठी मोफत विमा पॉलिसी काढण्यात येणार आहेत. या शिबिराचे उदघाटन शाळा व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष नारायण दळवी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी सहाय्यक पोस्ट मास्तर जनरल पुणे मा. अविनाश पाखरे, अधीक्षक, डाक घर पुणे ग्रामीण मा. बाळकृष्ण एरंडे, उपअधिक्षक, डाक घर पुणे ग्रामीण लक्ष्मण शेवाळे , SPM लोणावळा पोस्ट ऑफिस श्रीमती मंगलताई गवळी मा. आदर्श सरपंच सौ. वस्तलाताई वाळंज, उपसरपंच आंबवणे मा. सुनील हुंडारे, सरपंच कुंभेरी ज्ञानेश्वर दाभाडे, जेष्ठ नागरिक नामदेव डफळ, ग्रामपंचायत सदस्य निलेश मेंगडे, ज्ञानेश्वर लोहकरे, सदस्या मेघाताई नेवासकर, अक्षरा दळवी ग्रामसेविका प्रतिभा कुंभार, पोलीस पाटील गणेश दळवी पंचक्रोशीतील आजी – माजी सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील तथा नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुणे ग्रामीण पोस्ट विभागातर्फे My Stamp व राम मंदिर प्रतिकृती देऊन नंदकुमार वाळंज यांना सन्मानित केले. या शिबिरासाठी मा.सुनील गरुड, मा.संजय साठे,मा विवेक थोरवे, मा. दत्तात्रय मोरे, मा.राजू ताव्हरे, मा. सुरेश माने,मा साक्षी चंदनशिवे मा.प्रतीक्षा बोराटे मा रोहन देशमुख या पोस्टातील अधिकारी वर्गाने शिबिरा च्या आयोजनात व यशस्वी साठी पूर्ण प्रयत्न केले. मुख्याध्यापक श्री देवरे यांनी प्रास्ताविक केले. मा पाखरे साहेब यांनी पोस्टाच्या योजनाची माहिती दिली. मा. नंदकुमार वाळंज यांनी आयोजकांचे आभार मानले.शिक्षक संजय कुलथे यांनी सूत्रसंचालन केले. सुरवातीलाच मान्यवरांचा सन्मानकेला.सोनू अनाजी वाळंज विद्यालयातील शिक्षक कर्मचारी यांनी कार्यक्रम पार पाडला.