मावळ दि.9 : आदिवासी भटका बहुजन संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने जागतिक आदिवासी दिन वडगाव मावळ येथे साजरा करण्यात आला.त्यावेळी प्रतिपादन करताना आमदार शेळके म्हणाले दुर्गम भागात राहूनही समाजाची संस्कृती, परंपरा जोपासण्यासाठी समाजबांधव मोठया संख्येने सभेस उपस्थित राहिले यावरून समाज किती एकसंध आहे हे दिसून येते.
मावळ तालुक्यातील आदिवासी समाजाला प्रगतीच्या वाटचालीत सहभागी करून घेण्याचे कार्य आपणास पुढील काळात करायचे आहे. आणि यासाठी विविध शासकीय योजना प्रभाविपणे राबवून आदिवासी बांधवांना सक्षम करण्यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्नशील राहिले पाहिजे असे आवाहन आमदार शेळके यांनी समाजातील लोकप्रतिनिधीना केले. तसेच मावळ तालुक्यातील 95 % आदिवासी बांधवांना हक्काची घरं नाहीत, अनेक आदिवासी पाड्यांवर लाईट, पाणी व रस्ते यासारख्या शासकीय सुविधा उपलब्ध नाही.
काही स्थानिक ग्रामपंचायतींचे प्रतिनिधी आदिवासी कुटुंबांना हक्काची घरं देण्यामागे राजकारण करत आहेत अशा आदिवासी कुटुंबांचे हक्क मारणाऱ्या प्रतिनिधीवर पोलीस प्रशासनाने कारवाई करावी असे मत यावेळी बोलताना संस्थापक अध्यक्ष माऊली सोनवणे यांनी व्यक्त केले. या सभेच्या मंचकावर आधी उपस्थित असणाऱ्या महसुल आधिकाऱ्यांना आदिवासी नेत्यानी विनंती करून ही ते सभेला थांबले नाही.त्यामुळे आदिम आदीवासी कातकरी समाजाला मुळ प्रवाहात आणण्याची यांची मानसिकता नसल्याचे मत माऊली सोनवणे यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माऊली सोनवणे, नागरी हक्क सुरक्षा समितीचे मानवदादा कांबळे, पै. चंद्रकांत सातकर, संभाजी राक्षे, आंबेगाव सरपंच भिकाबाई वाघमारे, कोथुर्णे मा. सरपंच भरत दळवी,विलास वाघमारे, अंकुश वाघमारे, भरत होला, सुरेखा माडे, मुकुंद केदारी, वसंत हिले इ. कार्यकर्ते व आदिवासी समाज मोठया संख्येने उपस्थित होते.