Wednesday, December 4, 2024
Homeपुणेलोणावळाजागतिक दिव्यांग दिनानिमित्त संवाद शाळेत शैक्षणिक साहित्य व चॉकलेटचे वाटप..

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त संवाद शाळेत शैक्षणिक साहित्य व चॉकलेटचे वाटप..

प्रतिनिधी: श्रावणी कामत
लोणावळा: जागतिक दिव्यांग दिनानिमित्त (जागतिक अपंग दिन) ३ डिसेंबर २०२४ रोजी लोणावळ्यातील संवाद शाळेत इंडियन स्काऊट अँड गाईड लोणावळा गिल्डच्या वतीने विशेष मुलांसाठी शैक्षणिक साहित्य व चॉकलेटचे वाटप करण्यात आले. यावेळी शाळेच्या कर्मचाऱ्यांनाही हँड टॉवेल व गोड पदार्थ देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान विशेष मुलांसोबत स्काऊट गाईडच्या काही उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. गिल्डच्या अध्यक्ष रत्नप्रभा गायकवाड यांनी आपल्या मनोगतातून या मुलांच्या प्रगतीसाठी योगदान देण्याचा मानस व्यक्त केला. यावेळी डॉ. कालेकर यांनी शैक्षणिक साहित्य पुरवून या उपक्रमाला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले.
कार्यक्रमात लोणावळा गिल्डच्या उपाध्यक्ष सायली जोशी, सचिव हेमलता शर्मा, सुलभा खिरे, सुनील शिंदे, श्रावणी कामत, पूर्वा गायकवाड, अंबिका गायकवाड, दामले मॅडम आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे समन्वयक सुनील शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या उपक्रमामुळे संवाद शाळेतील विशेष मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाचा क्षण पाहायला मिळाला.
- Advertisment -

You cannot copy content of this page