Tuesday, October 15, 2024
Homeपुणेलोणावळाजागृती मित्र मंडळाच्या वतीने विविध क्षेत्रात नावलौकिक करणाऱ्या मान्यवरांचा विषय सत्कार…

जागृती मित्र मंडळाच्या वतीने विविध क्षेत्रात नावलौकिक करणाऱ्या मान्यवरांचा विषय सत्कार…

वाकसई : नवरात्र उत्सव व विजयादशमीचे औचित्य साधून जागृती मित्र मंडळाच्या वतीने विविध क्षेत्रातील उल्लेखनिय कार्य करणारे तसेच स्थानिक असून जिल्ह्यात नाव लौकिक करणाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
जागृती मित्र मंडळाच्या वतीने गेली अनेक वर्ष नवरात्रौत्सव अगदी उत्साहात साजरा केला जातो. यंदाच्या वर्षीही नवरात्र उत्सवाच्या निमित्त मंडळाच्या वतीने गरबा रास दांडिया सह महिलांसाठी होम मिनिस्टर व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे विजययादशमीचे औचित्य साधून गावातील ह भ प अनंता महाराज शिंदे ( पोलीस पाटील देवघर) यांना राज्यस्तरीय वारकरी समाज भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच वाकसई येथील लक्ष महादेव भवर याने जिल्हास्तरीय योग स्पर्धेत गावाचे व मावळाचे नावलौकिक केल्याबद्दल त्याचाही सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला व वाकसई गावातील कन्या अनुष्का संदीप विकारी हिने राज्यस्तरीय कब्बड्डी स्पर्धेत कलाकौशल्य दाखवून आपल्या संघाला विजय मिळवून दिल्याबद्दल तिलाही मंडळाच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी नवरात्र उत्सवाचे अध्यक्ष मंगेश येवले,उपाध्यक्ष किरण भोईने, खजिनदार सुधीर येवले,सचिन येवले, नागेश मांजिरे, संदीप येवले, गोविंद देवले,निलेश येवले, दिलीप येवले, किरण येवले, वैभव मडके, अक्षय येवले, रितेश येवले, दत्ता येवले, प्रतीक येवले,अमोल येवले आदी कार्यकर्त्यांसह महिला व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page