वाकसई (प्रतिनिधी): नवरात्र उत्सवानिमित्त वाकसई मावळ येथील जागृती मित्र मंडळ आयोजित नवरात्र उत्सवाच्या मुख्य अतिथी म्हणून भाजपा महिला आघाडी मावळ तालुका अध्यक्षा सायली बोत्रे यांची उपस्थिती लाभली.तर आपला मोलाचा वेळ देऊन सदर कार्यक्रमास उपस्थित राहिल्या बद्दल त्यांचे आभार मानण्यात आले तसेच मंडळाच्या वतीने सायली बोत्रे यांना शाल, श्रीफळ व पुष्प गुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
वाकसई येथील जागृती मित्र मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे देवीची प्राण प्रतिष्ठापना तसेच नऊ रात्र रास गरबा व महिलांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी आठव्या माळेचे औचित्य साधून महिलांसाठी तळ्यात मळ्यात, पायाने फुगे फोडणे, पळत जाऊन ग्लासने पाण्याची बाटली भरणे,स्ट्रॉ ने पाणी उचलून ग्लास भरणे, बॉल मानेमध्ये धरून बादली मध्ये टाकणे, बॉल फेकून बाटली उडविणे, ग्लास चे थर लावणे, तसेच नेम धरून बॉल बादलीमध्ये टाकणे इत्यादी आकर्षक स्पर्धांचे आयोजन मंडळाच्या वतीने करण्यात आले. सदर स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ 5 ऑक्टोबर विजया दशमीच्या शुभ मुहूर्तावर होणार असल्याचे जागृती मित्र मंडळाकडून सांगण्यात आले .
यावेळी मंडळाच्या वतीने प्रमुख पाहुणे सायली बोत्रे यांना महिलांना मार्गदर्शन करण्याची संधी दिली. त्यावेळी जागृती मित्र मंडळाच्या वतीने महिलांसाठी आयोजित केलेल्या स्पर्धा हा उपक्रम खरोखरच उल्लेखनीय असून महिलांनी अशा स्पर्धामध्ये भाग घ्यावा असे मार्गदर्शन करत सर्व स्पर्धक महिलांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी स्पर्धा पाहण्यासाठी स्थानिक महिला,पुरुष व लहानांनी जेष्ठानी अफाट गर्दी केली होती. जागृती मित्र मंडळाने केलेला छोटे खानी उपक्रम खरोखरच प्रशंसनीय आहे.