कामशेत (प्रतिनिधी) : स्वातंत्र्याच्या अमृत मोहोत्सव साजरा करताना स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापनदिनानिमित्त दि.12 रोजी जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा कामशेत ची जनजागृती रॅली उत्सहात संपन्न झाली.
शासनाच्या सूचनेनुसार “हर घर तिरंगा ” मोहिमे अंतर्गत कामशेत शहरात प्रभात फेरी काढून देशाप्रति प्रेम व अभिमाना बद्दल जनजागृती करण्यात आली. तसेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना मान्यवरांच्या हस्ते शाळेतील ध्वजारोहन करण्यात आले.तर दि.13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या तीनही दिवस विध्यार्थ्यांसाठी मेहंदी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, समूहगीत स्पर्धा व वेषभुषा स्पर्धा अशा शालेय विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. तसेच या स्पर्धामध्ये सहभागी झालेल्या विध्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने गौरव करण्यात आला.
प्रभात फेरीचे मुख्य आकर्षण म्हणजे प्रभात फेरीतील विध्यार्थी व शिक्षकांचा उत्साह बघून कामशेत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय जगताप हे स्वतः प्रभात फेरीत सहभागी झाले व विध्यार्थ्यांचे कौतुक करत चॉकलेट वाटप केले. त्यांच्या या सहभागाने विध्यार्थी व शिक्षक भारावून गेले होते. यावेळी शाळेच्या वतीने त्यांचे आभार मानन्यात आले. सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडावा यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेवून आजादी का अमृत महोत्सव खूप जल्लोष व आनंदात पार पाडला.