Saturday, December 21, 2024
Homeमहाराष्ट्ररायगड" जिल्हा प्रमुख चषक-२०२४ " क्रिकेट सामन्यांचे शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख संतोष...

” जिल्हा प्रमुख चषक-२०२४ ” क्रिकेट सामन्यांचे शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख संतोष शेठ भोईर यांच्या शुभहस्ते उद्घाटन !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत तालुक्यातील वासर्याचा खोंडा परिसरात आपल्या ” युक्ती आणि शक्तीने ” राजकीय पटलावर नेहमीच आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे , गेली ३० वर्षे कर्जत खालापुरच्या राजकारणातील बलाढ्य नेतृत्व शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख संतोष शेठ भोईर यांच्या कार्याचा गवगवा सर्वदूर व्हावा , म्हणून ” जिल्हा प्रमुख चषक – २०२४ ” चे आयोजन तमनाथ ग्रामपंचायतीचे उपसरपंच रविंद्र पुंडलिक भोईर यांनी तमनाथ येथे केले आहे . या सामन्यांचे उद्घाटन जिल्हाप्रमुख संतोष शेठ भोईर यांच्या प्रमुख उपस्थितीत सरपंच सौ .आरती संदीप भोईर व सदस्य सौ. गीता देशमुख यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात या ” भव्य दिव्य लाखो रुपये बक्षिसे ” असलेले डे नाईट क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलन करून व नारळ वाढवून करण्यात आले . तसेच यावेळी क्रिडांगणाचे देखील उद्घाटन करून सामान्यांना सुरुवात झाली.
यावेळी प्रथम सामना शिवशक्ती कडाव विरुद्ध उमरोली क्रिकेट संघाचा झाला.यावेळी या सामन्यांना प्रथम – 1 लाखाचे बक्षीस , द्वितीय बक्षास – 50 हजार , तृतीय बक्षिस 25 हजार उपसरपंच रविंद्र पुंडलिक भोईर यांच्यातर्फे देण्यात आले , तर चतुर्थ बक्षिस 25 हजार समीर जगन्नाथ गुरव , चतुर्थ बक्षिस 25 हजार रुपेश बाळू भोईर यांच्याकडून देण्यात येणार आहेत .सर्व ट्रॉफी ” फक्त पार्टी ग्रुप ” , सर्व सन्मान चिन्ह चंद्रकांत लक्ष्मण भोईर ,व मनोरंजन संगीत कार्यक्रमात शरद भोईर ,यांच्याकडून देण्यात आले आहे.

या जिल्हा प्रमुख चषक – २०२४ सामन्यांच्या उद्घाटन प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष शेठ भोईर , सरपंच सौ. आरती संदीप भोईर , उपसरपंच रविंद्र पुंडलिक भोईर , सदस्य सौ. गीता देशमुख , त्याचप्रमाणे अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page