रायगड (दत्तात्रय शेडगे)जिल्ह्यातील पंचेचालीस प्राथमिक आरोग्य केंद्रातील अचानक कार्यामुक्त केलेल्या कंत्राटी डॉक्टरांनी पालकमंत्री अदिती तटकरे यांची भेट घेत गेली दोन वर्षे कोरोना काळात प्रामाणिकपने केलेल्या कामाचा विचार करून कार्यामुक्त नकरता पुढील नियुक्तीसाठी विचार करावा अश्या आशयचे निवेदन देण्यात आले.
दोन वर्षांपूर्वी बीएएमएस डॉक्टरांची जिल्हापरिषदेने संपूर्ण राज्यात नियुक्ती करण्यात आली होती यापैकी पॅंचेचालीस डॉक्टर रायगड जिल्ह्यात नियुक्त करण्यात आली होती या सर्व डॉक्टरांनी कोरोना काळात प्रामाणिकपने अतिशय मेहनत घेत जिल्ह्यात कोरोनाला आवर घालण्यासाठी केलेली मेहनत कौतुकास्पद होती मात्र सध्या महाराष्ट्र शासनाने आलेल्या नवीन जी आर नुसार एमबीबीएस बांधपत्रित करारावर आलेल्या डॉक्टरांना नियुक्त करीत कार्यात रुजू असलेल्या बीएएमएस डॉक्टरांना कार्यामुक्त करण्यात आले आहेत.
या डॉक्टरांनी कोरोना काळात कोरोना रुग्णांची तपासणी, विलगीकरण, कंटेनमेंट झोन डिकलरेशन,पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी आणि तपासणी करून ट्रीटमेंट किंवा अँटीजेन टेस्ट अशा विविधप्रकारे शासनमान्य काम केली असताना आता आलेल्या जिआर नुसार आम्हाला कार्यामुक्त केल्याने आम्ही काय करणार तरी प्रशासनाने आमच्या कार्याची दखल घेत कोणतातरी मध्यममार्ग काढावा अशी विनंती यावेळी डॉक्टरांनी पालकमंत्री अदिती तटकरेंकडे निवेदणाद्वारे केली.