आज कोराईगड शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. नंदकुमार वाळंज यांचा वाढदिवस आंबवणे येथे सोनू अनाजी वाळंज माध्यमिक विद्यालयात मान्यवर व विद्यार्थ्यांसोबत साजरा करण्यात आला.या निमित्ताने शाळेत विविध स्पर्धा आयोजित केल्या त्याचे बक्षीस मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
समवेदना संस्था पुणे यांच्या वतीने महिलासाठी कर्करोग निदान व विद्यार्थी आरोग्य तपासणी करण्यात आली.या साठी प्रा. आरोग्य केंद्र आंबवणे व सहारा येथील आरोग्य अधिकारी यांचे सहकार्य लाभले.
आज वाढदिवसाच्या निमित्ताने बिपीनजी देसाई, नरेन्द्रजी लोढा, शांताराम इंगवले मा.जि. प सदस्य, शंकरभाऊ मांडेकर जि. प. सदस्य. मा. रवींद्र कंधारे मा. सभापती मुळशी, सुमित कुमार डेपोटी C O. ऍम्बे व्हली, आदित्य देशमुख, भाटिया साहेब, कैलास ढोले, मा. राजेंद्र सगर अध्यक्ष काव्यमित्र संस्था पिंपरी, विनयजी विद्वांस उपाध्यक्ष कोराईगड शिक्षण संस्था , अंकुश वाशिवले मा. सरपंच., गणपत मेंगडे मा. सरपंच,दिलीप आंब्रे उदयोजक पिंपरी,, सौ देसाई मॅडम, सौ, लोढा मॅडम, सौ. वत्सलाताई वाळंज आदर्श सरपंच, गेंगजे सर, चाळक सर, देविदास मेंगडे मिलिंद वाळंज कॅनरी फार्म, सागर वाळंज ,गोरक्ष मेहता, अभिषेक विद्वांस,गणेश पवार, सुभाष देशपांडे, या मान्यवरांनी बाबूजी ना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थिती लावली.
विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीताने पाहुण्यांचे स्वागत केले. सर्व मान्यवरांचा श्री. भटू देवरे मुख्याध्यापक, श्री. नारायण दळवी अध्यक्ष,शा. व्य. समिती,श्री. योगेश वाळंज अध्यक्ष, शिक्षक पा. संघ. यांच्या शुभ हस्ते सन्मान केला.बाबूजीचे औक्षण करून विद्यार्थ्यांसोबत केक कापण्यात आला.
आलेल्या मान्यवरांनी बाबूजींना वाढदिवसाच्या पुष्प गुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. काव्यमित्र संस्था पुणे यांचे कडून बाबूजींना मानपत्र प्रदान केले.या प्रसंगी यशवंत माताळे,ज्ञानेश्वर दाभाडे,नंदू आखाडे, नामदेव हिरवे, किसन मरवडी, यशवंत माताळे, गोरक्ष मेहता मा.उपसरपंच, देविदास मेंगडे मा.उपसरपंच, आबासाहेब मरवडी उल्हास मानकर, मारुती मेंगडे, भरत मेंगडे, सचिन चव्हाण, गणेश वाळंज, नवनाथ दळवी, रा काँग्रेस युवक अध्यक्ष मुळशी विलास हुंडारे,असंख्य कार्यकर्ते हजर होते.
पंचक्रोशीतील आजी – माजी सरपंच, पोलीस पाटील तसेच बहुसंख्य युवा कार्यकर्ते उपस्थित होते.भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला.या कार्यक्रमाचे श्री कुलथे सर यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापक श्री.देवरे यांनी प्रास्ताविक केले.आलेल्या सर्वांचे आभार स्वतः बाबूजी नंदकुमार वाळंज यांनी मानले. शिक्षक, कर्मचारी,विद्यार्थी यांनी कार्यक्रम यशस्वी पार पाडला.