Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडजे सुरेश लाडांचे झाले नाहीत , ते तटकरेंचे काय होणार ? संतोष...

जे सुरेश लाडांचे झाले नाहीत , ते तटकरेंचे काय होणार ? संतोष शेठ भोईर यांची सुधाकर घारे यांच्यावर टिका !

आमचा वापर करून निवडून आल्यावर आम्हाला पाठ दाखवणार , हि सुनील तटकरे यांचा स्वभाव – जिल्हाप्रमुख संतोष शेठ भोईर..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जतच्या राजकारणात ज्यांनी बोट धरून आणले , उच्च पद दिले त्या सुरेश लाडांचे सुधाकर घारे झाले नाहीत , ते तटकरेंचे काय होणार ? असा घणाघाती सवाल करत शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष शेठ भोईर यांनी सुधाकर घारेंनी कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्यावर केलेली आगपाखड हि ” बालिश बुध्दीची ” असून तटकरे यांना खुश करण्यासाठी या घेतलेल्या पत्रकार परिषदेतून दिसून येत असून त्यांना एव्हढी घाई असेल तर निवडणुकीच्या रिंगणात उतरुंनच दाखवा , येथील जनताच तुम्हाला तुमची जागा दाखवतील , व तुम्ही आयुष्यभर ” भावीच ” रहाल , असा खरपूस समाचार आज बाळासाहेब भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष शेठ भोईर यांनी सुधाकर घारे यांचा घेतला.

आज दिनांक २६ मार्च २०२४ रोजी संध्याकाळी ६ – ०० वाजता सुधाकर घारे यांनी दोन दिवसांपूर्वी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या वर केलेल्या आरोपांचे खंडन करण्यास ” बाळासाहेब भवन ” येथे पत्रकार परिषदेचे आयोजन शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात आले होते . यावेळी जिल्हाप्रमुख संतोष शेठ भोईर , उपजिल्हाप्रमुख भाई गायकर , कर्जत तालुका प्रमुख संभाजी जगताप , खालापूर तालुका प्रमुख संदेश पाटील , जिल्हा पदाधिकारी गोविंद बैलमारे , विधानसभा संघटक शिवराम बदे , युवा तालुका प्रमुख अमर मिसाळ , मते , सुरेखा शितोळे , उप तालुका प्रमुख ताम्हाणे , संकेत भासे , अभिषेक सुर्वे , दिनेश कडू , त्याचप्रमाणे शिवसेना – युवा सेना – महिला आघाडीच्या अनेक पदाधिकारी व मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते.

यावेळी जिल्हाप्रमुख संतोष शेठ भोईर पुढे म्हणाले की , पेण येथे झालेल्या बैठकीत आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचे भाषण च प्रसिद्ध झाले , इतर पदाधिकारी यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या बाबतीत ज्या समस्या सांगितल्या त्यावर त्यांनी जिल्ह्याचे नेते आमदार भरत शेठ गोगावले यांना सल्ला देवून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कडे बैठक घेवुन महायुतीतील नेते सुनील तटकरे जर असे वागत असतील तर त्यांची कोण गॅरंटी घेणार , ते सर्वांचा वापर करून घेतील , व नंतर होणाऱ्या निवडणुकीत जर पाठ दाखवणार असतील तर अश्या त्यांच्या स्वभावामुळे त्यांचा कडेलोट होईल म्हणजे पराभव होईल , म्हणून त्यांनी वागण्यात बदल करून घेतला पाहिजे , हा त्याचा अर्थ होत असताना , सुधाकर घारे यांनी घेतलेला अर्थ व केलेली बालिश टिका विपर्यास असून तुम्हाला जर घाई असेल तर तुम्ही निवडणूक लढवूंनच दाखवा , मग कोण कुणाला हत्तीच्या पायाखाली चिरडतात , हे येथील सुज्ञ नागरिक च दाखवून देतील , असे आव्हान देखील त्यांनी यावेळी केले . रायगड व मावळ चे जो कुणी महायुतीचे उमेदवार असेल त्यांना मोठ्या संख्येने निवडून देण्याचे आवाहन देखील आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी त्यांनी केले असून आमदार महेन्द्र शेठ थोरवे हे सूर्य आहेत , त्यांच्यावर टिका कराल तर तुम्हीच भस्मसात व्हाल , असे खडे बोल त्यांनी सुनावले.

ते पुढे म्हणाले की , ज्यांचं बोट धरून राजकारणात आलात त्यांच्यावर झालेल्या टिकेला त्यावेळी उत्तर दिले नाहीत , मग तटकरेंना खुश करण्यासाठी हि अशी चुकीची आगपाखड केली का , असा सवाल देखील संतोष शेठ भोईर यांनी उपस्थित केला . मागच्या पक्ष प्रवेश कार्यक्रमात यांचा ठेका आहे , भावाचा – भाच्याचा टोल चां धंदा आहे , हे तुम्ही महायुतीत असल्यामुळे आमदारांवर टिका करणे , चुकीचे आहे , यावर देखील त्यांनी प्रकाश टाकला . दोन्ही मतदार संघात भविष्यात महायुतीत नुकसान होणार नाही अशी आम्ही काळजी घेवू असे आश्वासन देखील जिल्हाप्रमुख संतोष शेठ भोईर यांनी दिले . अमोल पाटील यांचा राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश झाला यावर संतोष शेठ भोईर यांनी खूप मार्मिक उत्तर दिले , पक्षात आलेल्या सर्वच कार्यकर्त्यांना सर्वच मिळत अस नाही , उद्या तुम्ही आईच काळीज मागाल , ते मिळेल का ? असा सवाल उपस्थित करत ते तिकडे गेले म्हणजे त्यांना तिकडे चॉकलेट दिले असेल म्हणून ते तिकडे गेले , सहा महिन्यांपर्यंत ते तिकडे रहातात का ते बघा , असे मत व्यक्त केले . आम्ही पण काही कमी नाही कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवेच पुन्हा निवडून येणार , असा टोला देखील त्यांनी याप्रसंगी लगावला व मावळचे उमेदवार आप्पा बारणे हे तीन लाखांचा लीड घेवून निवडून आणू , असे आवाहन सर्व शिवसैनिकांना जिल्हाप्रमुख संतोष शेठ भोईर यांनी केले . यावेळी उपजिल्हाप्रमुख भाई गायकर , संघटक शिवराम बदे , कर्जत तालुका प्रमुख संभाजी जगताप , खालापूर तालुका प्रमुख संदेश पाटील , युवा तालुका प्रमुख अमर मिसाळ ,संकेत भासे यांनी देखील सुधाकर घारे यांच्यावर तोफ डागली.
- Advertisment -

You cannot copy content of this page