Thursday, July 3, 2025
Homeपुणेलोणावळाजोशाबा जयंती महोत्सव उत्साहात संपन्न; स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साळवे...

जोशाबा जयंती महोत्सव उत्साहात संपन्न; स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साळवे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित..

लोणावळा : जोशाबा मजूर कष्टकरी संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने, अध्यक्ष मा. अंकुश भाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली 11 एप्रिल 2025 रोजी लोणावळा शहरात जोशाबा जयंती महोत्सव उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आला.
महोत्सवाची सुरुवात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिराव फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत संविधानाच्या प्रतिमेचे पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ‘रमेश भाऊ भीमाचा वाघ’ या गीताचे सादरीकरण. दलित पँथरपासून समाजकार्यात सक्रीय असलेल्या रमेश भाऊ साळवे यांच्या जीवनकार्यावर आधारित हे गीत सामाजिक चळवळीचा प्रेरणास्रोत ठरले. सुप्रसिद्ध गायक-अभिनेते मिलिंद शिंदे (मावळचा राव) यांच्या आवाजातील या गीताचा स्क्रीनवर प्रसार झाला. यावेळी खुद्द शिंदे यांची उपस्थिती लाभली होती. गीताचे औपचारिक सादरीकरण माजी उपनगराध्यक्ष मा. आर. डी. जाधव यांच्या हस्ते झाले.
महोत्सवाचे प्रमुख पाहुणे म्हणून स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेशभाऊ साळवे उपस्थित होते. त्यांच्या सोबत रंजना ताई भोसले, मधुकरजी भालेराव, अरुण भिंगारदिवे, आर. डी. मुंढे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्व मान्यवरांनी जोशाबा यांच्या कार्याचा गौरव करत जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष दत्तशेठ देसाई, सोमनाथ बोभाटे, नामदेव राठोड, राहुल गायकवाड, विशाल कांबळे, उमेश कांबळे, साधना नाईक, पूनमताई चव्हाण, रेश्मा सूर्यवंशी, सागर साबळे, चंद्रकांत ओव्हाळ, किशोर वंजारी, जे. के. गरड, दत्ता बडकर, रामशंकर गुप्ता, निलेश गायकवाड, संदीप कांबळे, नितीन वाघमारे, सुनील गायकवाड आदी मान्यवरांनी विशेष मेहनत घेतली.
कार्यक्रमाच्या शेवटी ‘छावा’ हा ऐतिहासिक चित्रपट दाखवण्यात आला. या चित्रपटाने उपस्थितांमध्ये सामाजिक भान जागवले आणि चळवळीची ऊर्जा दिली.
जोशाबा मजूर कष्टकरी संघटनेतर्फे आयोजित जयंती महोत्सव यंदाही प्रेरणादायी ठरला. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शिस्तबद्धतेने आणि समर्पण भावनेने आयोजन करून कार्यक्रमाला यशस्वी केले.
- Advertisment -

You cannot copy content of this page