if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
लोणावळा (प्रतिनिधी):महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त जोशाबा मजूर कष्टकरी संघटनेच्या वतीने महामानवांचा सयुक्त जयंती महोत्सव 11 एप्रिल रोजी दिमाखात साजरा करण्यात आला.या वेळी महामानवांच्या प्रतिमेस प्रमुखांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरवात करण्यात आली.
महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक राहूल शिंदे यांचा प्रबोधनपर गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.तसेच दरम्यान जाहीर सभेचे आयोजनही करण्यात आले होते.
मजुरांची ही परिस्थिती जर बदलायची आसेल तर महात्मा फुले यांनी जो सन्मार्ग दाखवला आहे त्या मार्गानेच गेल्याशिवाय तुमची परस्थिती बदलनार नाही ही वस्तुस्थिती आहे हे आपण जानले पाहीजे ,,शिक्षण घेवूनच तुमच्यात बद्दल होईल,मुलांना शिकवलं पाहीजे ,बदल हा निसर्गाचा नियम आहे, बदल हा होनारच,पण आजून वेळ लागेल ,मग ते राजकारण आसो ,समाजकारण आसो वा शैक्षणिक आसो”ज्या विद्यार्थ्यांनी शिक्षणात यश संपादन केले ,त्या कु दिक्षा शाम नाईक जिने mpsc करून पोलिस भरतीची परिक्षा दिली व विपरीत परिस्थितीमध्ये आपल्या पालकांची व स्वता:ची स्वप्न पुर्ण केलेली कु शिवानी रामकृष्ण गुप्ता या मुलींना ” जोशाबा सन्मान 2023 “ह्या पुरस्काराने गौरविण्यात आले,तसेच समाजामधील गोरगरीबां मधील घटकांना न्यायालयात संविधानिक मार्गाने गेली आनेक वर्ष ज्या मदत करतात त्या अँड रंजना ताई भोसले यांनाही जोशाबा सन्मान 2023 या पुरस्काराने गौरविण्यात आले.
या भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन जोशाबा मजूर कष्टकरी संघटनेचे अध्यक्ष अंकुश भाऊ चव्हाण,जयंती महोत्सव अध्यक्ष नामदेव राठोड, खजिनदार श्रीकांत कुलकर्णी ,सागर साबळे,
चंद्रकांत ओव्हाळ ,रमेश ओव्हाळ,दिनेश शिंदे,किशोर वंजारी, साधना नाईक,सुमन धोत्रे,विनोद साबळे व सर्व जोशाबा पदाधिकारी यांनी केले होते.