if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
टाकवे बुद्रुक : टाकवे बुद्रुक येथील मध्यवर्ती ठिकाणी भाजपा संपर्क कार्यालयाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले . टाकवे – नाणे जिल्हा परिषद गटाचे अध्यक्ष रोहीदास असवले यांच्या पुढाकाराने या कार्यालयाची उभारणी करण्यात आली आहे.
नागरिकांच्या समस्या सोडवीण्यासाठी तसेच केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून येणाऱ्या योजनांविषयी माहिती नागरिकांना सहजपणे सविस्तर उपलब्ध व्हावी याकरिता व पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते यांना समन्वय साधण्यासाठी पक्ष कार्यालयात हक्काची जागा मिळावी यासाठी सदर संपर्क कार्यालय उभारण्यात आले आहे .
या प्रसंगी खासदार अमर साबळे , पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे , माजी आमदार दिगंबर भेगडे , अध्यक्ष रविंद्र भेगडे , माजी सभापती गुलाबकाका म्हाळसकर , टाकवे अध्यक्ष दत्तात्रय असवले , तुकाराम कोंद्रे , राजु शिंदे , विकास असवले , काळुराम घोजगे , काशिनाथ जांभुळकर , मुन्नावर आत्तार , शिवाजी खंडु असवले , बाबाजी घोजगे , शंकर असवले , संजय जगताप , बाळासाहेब असवले , साहेबराव आंबेकर , रोहीदास जांभुळकर , पराग सावंत , भगवान लोंढे , प्रंशात शिंदे , संतोष असवले , विठ्ठल तुर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.