if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) सध्या कर्जत नगर परिषदेचा कारभार दिवसेंदिवस ढासळत चालला आहे . अनेक सोई सुविधांचा अभाव नागरिक सहन करत असताना आता त्यांच्या जीवावर बेतन्याची स्थिती येवून ठेपली असून सप्टेंबर – ऑक्टोंबर मध्ये दमट वातावरणामुळे डासांची उत्पत्ती होवून डेंग्यू सारखे जीवघेणे आजार नागरिकांत होवून देखील त्या पद्धतीने गांभीर्याने विचार करून कर्जत नगर परिषद जंतुनाशक फवारणी करताना दिसत नाहीत.
याचाच परिणाम कर्जत शहरात दिवसेंदिवस डेंग्यू रुग्णात कमालीची वाढ होत असून नागरिकांच्या जीवावर बेतल्यास कर्जत न . प . जबाबदार असेल , असा संतप्त इशारा वंचित बहुजन आघाडीचे कर्जत तालुका अध्यक्ष धर्मेंद्र दादा मोरे यांनी पालिकेला दिला असून याविरोधात त्वरित सर्व प्रभागात जंतुनाशक फवारणी न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व एखादा रुग्ण दगावल्यास आपल्या विरोधात जिवीतहानी केल्याबद्दल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येईल , असे निवेदन पालिकेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांना आज दि. ६ ऑक्टोंबर २०२३ रोजी देण्यात आले.
कर्जत शहरात गेल्या महिनाभरापासून डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत , परंतु कर्जत नगरपरिषद प्रशासन उदासीन दिसत आहे , वेळीच कर्जत नगरपरिषदेने जंतूनाशक फवारणी केली असती तर दमट वातावरणामुळे डेंग्यू चे डास वाढले नसते. आज कर्जत शहरात शेकडो डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. तरी सुद्धा कर्जत नगरपरिषद प्रशासन कुठल्याही प्रकारची उपाययोजना करणेस तयार नाही.
याबाबतीत वंचितचे अध्यक्ष धर्मेंद्र दादा मोरे व पदाधिकारी यांनी उपजिल्हा रुग्णालयात देखील भेट घेवून डॉक्टरांशी चर्चा करून रुग्णांना योग्य व त्वरित उपचार होण्यासंबंधी सूचना दिल्या , व नागरिकांनी देखील कुठलाही आजार अंगावर न काढता उपजिल्हा रुग्णालयात तपासणी करावी , असे आवाहन देखील कर्जत ता. अध्यक्ष धर्मेंद्र दादा मोरे यांनी कर्जतकर नागरिकांना केले आहे व पालिकेच्या ढोबळ बेजबाबदार कामाचा संताप व्यक्त करत त्वरित जंतुनाशक डासांचा समूळ नष्ट करण्यासाठी जंतुनाशक फवारणी करण्याची मागणी केली आहे .
सदरचे निवेदन देताना सम्यक विद्यार्थी आंदोलनचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ऍड . कैलासजी मोरे , वंचित बहुजन आघाडीचे कर्जत ता. अध्यक्ष धर्मेंद्र दादा मोरे , जिल्हा सचिव अनिल गवळे , ता. उपाध्यक्ष विद्यानंद ओव्हाळ , महासचिव प्रदीप ढोले , सचिव प्रदीप गायकवाड , सम्यकचे प्रविण सोनावणे, कमळकर जाधव, नामदेव जाधव, दिपक जाधव, निलेश पवार , प्रज्वल जाधव, सुदर्शन गायकवाड , अनिकेत गायकवाड , संदिप ढोले , अशोक ढोले आदी पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.