![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(isset($image5)); {?>
![]()
} ?>
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) भारतीय घटनेचे शिल्पकार – विश्वरत्न – महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर रोजी ६७ व्या ” महापरिनिर्वाण दिनी ” कर्जत नगर परिषद हद्दीतील जुने एस. टी. स्टँड परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ व परिसरातील नागरिकांच्या वतीने चौकात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलित व मेणबती पेटवून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी मंडळाचे ज्येष्ठ पदाधिकारी सुनील चव्हाण यांच्या शुभहस्ते ६ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ७ वाजता भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलित करण्यात आले व सर्वांनी असंख्य मेणबती पेटवून अभिवादन केले.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाचे ज्येष्ठ पदाधिकारी सुनील चव्हाण , गुंडगे प्रभागाच्या नगरसेविका वैशाली मोरे , दिपक मोरे , श्रीमती गंगावणे , सुनंदा चव्हाण , सुनील जाधव , अनिल जाधव , रमेश येवले , संतोष सोनावणे , कांबळे , सचिन चव्हाण , पवार त्याचप्रमाणे परिसरातील अनेक बहुजन वर्ग , महिला उपस्थित होते.