(कर्जत प्रतिनिधी गुरुनाथ नेमाणे)
दि.6.कर्जत शहरात मधील भिसेगाव परिसरात मध्ये मानवसेवा बहुउद्देशीय संस्था कर्जत आज ६,डिसेंबर 2020 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले आहे. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आहे.तसेच कर्जत परिसरातील भिसेगाव आदिवासी(कातकरी वाडी ) मध्ये तेथील मुलांना गोरगरीब आणि गरजू मुलांना मानवसेवा बहुउद्देशीय संस्था वतीने मोफत अन्नदान करणयात आले आहे.
त्याचवेळी त्यांना मुलांना शिक्षणाचे महत्त्व समजून त्याना शिक्षणाविषयी मार्गदर्शन करण्यात आले होते,प्रत्येक आठवड्याला शिक्षण विषयी आणि प्रशिक्षण कला कौशल्य संदर्भात माहिती देणायत येणार आहे.आताच्या डिजिटल इंडियाच्या माध्यमातून प्रत्येक गोरगरीब गरजू मुले शिक्षण फारच गरज आहे.यासंदर्भात कोणत्याही गोरगरीब मुलांना आणि मुलींना शिक्षण विषयी संस्था माध्यमातून काही सोयी सुविधा उपलब्ध करणयात येणार आहेत.
यावेळी उपस्थित मानवसेवा बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष दीपक जगताप, मानवसेवा बहुउद्देशीय संस्था महिला अध्यक्षा सविता जगताप,भिसेगाव पोलिस पाटील हजारे,सुंदराबाई वाघमारे,सामाजिक कार्यकर्ते तलाठी डी.डी मोरे,उषा जाधव,कांचन धारगावे,सुमित सिंग सर आणि आनंद सावंत सर इत्यादी आदी सह आणि मुले आणि मुली व महिला वर्ग ही आणि नागरिक उपस्थित होते.