Saturday, March 15, 2025
Homeपुणेलोणावळाडॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महपरिनिर्वाण दिनानिमित्त "अष्ट दिशा" च्या वतीने...

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महपरिनिर्वाण दिनानिमित्त “अष्ट दिशा” च्या वतीने अभिवादन…

लोणावळा दि.6 : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन ६ डिसेंबर रोजी आयोजित केला जातो.डॉ. बाबासाहेब  आंबेडकरांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे महापरिनिर्वाण (निधन) झाले होते, याच्या दुसऱ्या दिवशी ७ डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले.

निधनापूर्वी आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता. त्यांना बौद्ध लोक ‘बोधिसत्व’ मानतात. आंबेडकर हे बौद्ध गुरु होते, यामुळे त्यांच्या पुण्यतिथीसाठी ‘महापरिनिर्वाण’ हा बौद्ध संकल्पनेतील शब्द वापरण्यात आला आहे.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त १ डिसेंबर पासून मुंबईतील त्यांचे समाधीस्थळ असलेल्या चैत्यभूमी येथे भारतभरातून लक्षावधी लोक येतात. चैत्यभूमी येथे २५ लाखाहून अधिक भीमानुयायी जमा होतात व चैत्यभूमी स्तूपात ठेवलेल्या आंबेडकरांच्या अस्थीकलश व प्रतिमेस अभिवादन करतात आणि बाबासाहेबांचे दर्शन घेतात.

या दिवशी भारत तसेच जगभरातील आंबेडकरवादी व्यक्ती आंबेडकरांची प्रतिमा व मुर्ती समोर ठेवून त्याच्या स्मृतीस अभिवादन करतात. स्थानिक बौद्ध विहारे (बौद्ध मंदिरे), स्वतःच्या घरी, सार्वजनिक स्थळी, शाळा-महाविद्यालये, शासकिय कार्यालये इ. या ठिकाणी या दिवशी त्यांना अभिवादन करतात. राजकीय नेते व इतर मंडळी बाबासाहेबांच्या सार्वजनिक ठिकाणच्या आंबेडकर स्मृतीस्थळांना वंदन करतात.

विद्येचे दैवत, ज्ञानाचे प्रतीक , परमपूज्य, दलितांचे कैवारी,शांती दूत, राज्यघटनेचे शिल्पकार,भारतरत्न डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांना ” अष्ट दिशाच्या ” वतीने विनम्र अभिवादन…

- Advertisment -

You cannot copy content of this page