Wednesday, July 2, 2025
Homeमहाराष्ट्ररायगडढोल ताशांच्या गजरात - फटाक्यांची आतिषबाजी - जोरदार घोषणाबाजी करत भव्य रॅलीने...

ढोल ताशांच्या गजरात – फटाक्यांची आतिषबाजी – जोरदार घोषणाबाजी करत भव्य रॅलीने उमेदवारी अर्ज दाखल…

शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार ” नितीन दादा सावंत ” यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) ” शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ” यांच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या कर्जत विधानसभा मतदार संघात आजपर्यंत ” भगवा ” डौलाने फडकत होता . याची पुनरावृत्ती पुन्हा होण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी ” मातोश्री ” चा विश्वास दृढ होण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे ” सेनापती तथा उपजिल्हाप्रमुख नितीन दादा सावंत ” यांना मिळालेली अधिकृत उमेदवारी म्हणजे कट्टर शिवसैनिकांचा विजयी झाल्यातच आहे . ” निवडून येईल मशाल , तर रहाल खुशाल ” याची हमी देत आपल्या मतदार संघात सर्वांगीण विकास – रोजगार – पाणी – आरोग्य – रस्ते – शिक्षण – महिला सक्षमीकरण – बचत गटांना उत्तेजन अशा विविध सोई सुविधा देण्यावर भर देणारे बॅनर झळकावत – ढोल ताशांच्या गजरात – फटाक्यांची आतिषबाजी – जोरदार घोषणाबाजी करत भव्य मिरवणूक काढून हजारोंच्या संख्येत जोरदार शक्तिप्रदर्शन करत आज सोमवार दिनांक २८ ऑक्टोंबर २०२४ रोजी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार नितीन दादा सावंत यांनी आपला उमेदवारी अर्ज कर्जत निवडणूक अधिकारी यांच्याकडे सादर केला.

यावेळी दोन्ही तालुक्यातून हजारो शिवसेना – युवासेना – महिला आघाडीचे हजारो पदाधिकारी व शिवसैनिक यावेळी या रॅलीत मोठ्या उत्साहाने दिसले . शिवसेना ठाकरे गटाचे संपर्क कार्यालय ” शिवालय ” येथून हि भव्य रॅली निघाली . ” छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर ” यांच्या स्मारकास उमेदवार नितीन दादा सावंत यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व आशीर्वाद घेतले तेथून कर्जत बाजारपेठेतून भव्य रॅलीत प्रशासकीय भवन येथे निवडणूक अधिकारी यांच्याकडे उमेदवारी नामनिर्देशन पत्र सादर केले.

सर्वांना बरोबर घेऊन जाणारा , शांत संयमी , कर्तृत्ववान नेतृत्व म्हणून उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत यांच्याकडे बघितले जाते . गेल्या अडीच वर्षांत कुठलीही सत्ता नसताना कट्टर शिवसैनिकांच्या जोरावर त्यांनी शिवसेना वाढवली व अखंडित ठेवून शिवसैनिकांची वज्रमूठ सारखी ताकद या मतदार संघात अबाधित ठेवली . ” कोरोना काळापासून ते आजपर्यंत ” आदिवासी वाड्या पाड्यात , ग्रामीण भागात वस्तीत त्यांनी पाणी – आरोग्य – गरजवंताना मदतीचा ओघ कायम ठेवला . अश्या दिलदार मनाच्या सेनापतीला या मतदार संघाचा ” आमदार ” झाल्याचे बघण्यास हजारोंच्या संख्येने शिवसैनिक आज जमा होवून त्यांचा जोश यावेळी द्विगुणित झाल्याचे दिसून येत होता .
- Advertisment -

You cannot copy content of this page