” लायन ग्रुप ” रायगड जिल्हा प्रमुख बॉबी शेठ वाघमारे……
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत तालुक्यातील युवकांचा आवडता नेता , छत्रपती – फुले – शाहू – आंबेडकर चळवळीतील एक प्रसिद्ध नाव , गरीब परिस्थिती मधून प्रगती ची वाट काढत समस्याग्रस्त – गोर गरिबांच्या अडचणी सोडवत , विद्यार्थ्यांना त्यांचे हक्क देवून त्यांच्या गळ्यातील ताईत बनलेले त्यांचा बुलंद आवाज व या तरुण शक्तीच्या पाठिंब्याने आज राजिपचे मा. उपाध्यक्ष , कर्जत खालापूर मतदार संघाचे लोकनेते ” सुधाकर भाऊ घारे ” यांच्या खास तालमीतील मर्जी सांभाळणारा एक युवा नेतृत्व , अनेक राजकीय पदे सांभाळत महाराष्ट्रातील प्रसिद्ध अश्या ” लायन ग्रुप ” चा रायगड जिल्हा प्रमुख होणे , असा ” डॅशिंग प्रवास ” करून आक्रमक व्यक्तिमत्त्व म्हणून उदयास आलेले ” बॉबी शेठ वाघमारे ” हे जिल्ह्यासहित कर्जत तालुक्यात आक्रमक नेते आहेत.
लहानपणातच वडील दिवंगत मनोहर वाघमारे यांच्या ” लीडर शिप ” करण्याच्या राजकीय मुशीत घडलेले बॉबी शेठ ऐन तरुणपणीच राजकीय पटलावर आक्रमक भूमिका घेत मोर्चे – आंदोलने – पिडीत नागरिकांच्या समस्या घेवून शासकीय दरबारी जात व त्या सोडवत असत . पोलीस स्टेशनला जावून अनेकांची प्रकरणे , भांडणे होवू न देता मिटवली आहेत . शैक्षणिक क्षेत्रात देखील त्यांचे भरीव काम असून अनेक विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिल्याने आज ही त्यांच्या पाठीशी युवा शक्ती असल्याने राजकीय पटलावर आज त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक जिल्हा सरचिटणीस पदाची जबाबदारी कर्जत खालापूर विधानसभेचे नेतृत्व मा. राजिप उपाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे यांनी दिली होती . त्यांच्या ते खास मर्जीतील असल्याने वरिष्ठ पातळीवर देखील पक्षात त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.
२८ फेब्रुवारी २०२५ आज त्यांचा वाढदिवस असून त्यांना शुभेच्छा व भेटण्यासाठी रात्रीपासूनच कार्यकर्ते , युवा शक्ती व शैक्षणिक – राजकीय – धार्मिक – सामाजिक – सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी व बहुजन वर्ग यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव करत असून पुढील उदंड आयुष्याच्या ईश्वर चरणी प्रार्थना करत आहेत .