Friday, November 22, 2024
Homeपुणेतरुणाईच्या अंतर्मनात डोकावणारा व योग्य जोडीदाराची निवड सांगणारा " मजनू " मराठी...

तरुणाईच्या अंतर्मनात डोकावणारा व योग्य जोडीदाराची निवड सांगणारा ” मजनू ” मराठी चित्रपट सर्वांनी पाहण्यासारखा..

१० जून रोजी होणार प्रदर्शित , मराठी चित्रपट हिट करण्याचे निर्माते गोवर्धन दोलताडे यांचे आवाहन…

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे)सध्या मराठी चित्रपट बनविणे , खूपच डेअरिंगबाज काम आहे , त्यातूनच प्रसिद्धी माध्यम , चित्रपटगृह , मनोरंजनात्मक कथा , या अग्नी परीक्षेतून निर्माता व दिग्दर्शकाला जावे लागत असताना सध्याच्या तरुणाईला भावेल , अशी कथा लिहून प्रेमाच्या लढाईत एक वेगळाच संदेश देणारे निर्माता गोवर्धन दोलताडे यांनी अविस्मरणीय चित्रपट बनविला असून ” मजनू ” या चित्रपटात आजच्या प्रेमाचं उत्तर त्यांनी देण्याचा प्रयत्न केला आहे . १० जून २०२२ रोजी महाराष्ट्राच्या मातीत , मराठी कुटुंबात शिजणार कुतूहल घेऊन तरुणाईच्या अंतर्मनात डोकावून आपल्या आई – वडिलांच्या शिकवणुकीचा विचार करायला लावणारा , प्रेमाचा – कॉमेडी – फायटिंग व मनात उत्सुकता निर्माण करणारा व चित्रपट समाप्तीच्या वेळेत तरुणाईला संदेश देणारा ” मजनू ” चित्रपट नक्कीच धूम मचावणार असे भाकीत आज निर्माते गोवर्धन दोलताडे यांनी कर्जत येथे रॉयल गार्डन च्या सभागृहात वर्तविले.

यावेळी सह निर्माता इरफान भोपाली , चित्रपटाचा नायक रोहन पाटील , नायिका श्वेतलाना अहिरे उपस्थित होते.यावेळी चित्रपटाचे नायक रोहन पाटील म्हणाले की , या ” मजनू ” चित्रपटात २ नायक आहेत मात्र नक्की , हिरो कोण , व्हिलन कोण , या पिक्चर ची स्टोरी वेगळी आहे , प्रेमात मुलीचा कोण फायदा घेतो , कोण तोटा करतो याचा नायिका विचार करते , या दोन नायका पैकी कुणाचा विचार करून ती प्रेम स्वीकारते , याचं उत्तर व प्रेमाचं कोड सोडविण्याचा प्रयत्न चित्रपटाच्या अंतिम टप्प्यात केला आहे.या ” मजनू ” चित्रपटात ४ गाणी आहेत , व ही गाणी आज हळदी समारंभात चांगलीच गाजत आहेत . फिल्म हिट होण्यासाठी सर्वांनीच खूप मेहनत घेतली आहे ,यांत लोकेशन खूपच भारी आहेत , आजच्या तरुणाईने प्रेम अजरामर करायचं असेल, यशस्वी करायचं असेल तर नक्कीच ” मजनू ” हा चित्रपट बघा , असे नायक रोहन पाटील यांनी सांगितले.तर या चित्रपटाची पनवेल येथे रहाणारी नायिका श्वेतलाना अहिरे हिचे या चित्रपटात ” कस्तुरी ” असे नाव आहे.

आजकालच्या तरुणीच्या प्रेमात नक्कीच २ ते ३ तरुण येतात , यावेळी आपल्या आयुष्याचा जोडीदार कोण ? हे या चित्रपटावरून मुलीला ठरवता येईल . असे नायिका श्वेतलाना अहिरे यांनी सांगितले . तर सहनिर्माते इरफान एम भोपाली म्हणाले की , महाराष्ट्र भर या ” मजनू ” पिक्चरचे शो होणार आहेत , हा चित्रपट बघून तरुण – तरुणीचे प्रॉब्लेम सुटणार आहेत , घरगुती कुटुंबातील समस्या , तरुण मुलांचे अडचणी , तरुण व आईवडील यांचे संबंध सुधारतील , हा पिक्चर घराघरात पोहचविणार असूनया चित्रपटाच्या समाप्तीला योग्य संदेश आम्ही तरुणाईला दिला आहे.


तर निर्माते गोवर्धन दोलताडे यांनी सांगितले की , ही घटना माझ्या आयुष्यातील आहे . या चित्रपटाची कथा २ मजनूची आहे , खऱ्या प्रेमाला कशी सुरुवात होते , प्रेम करणाऱ्या मूला – मुलींच्या बाबतीत जाती – धर्म आणू नका , त्यांचं कश्यात सुख आहे , ते बघणे गरजेचे आहे , मुलगी पळून गेली तर प्रथम मला आईवडिलांचा धोका आहे , असे पोलीस स्टेशनमध्ये सांगतात , ही परिस्थिती वाईट आहे , म्हणूनच यावर बदल व्हावा , अशी ही ” मजनू ” चित्रपटाची कथा असून सर्व कुटुंबातील सदस्यांनी चित्रपट गृहात जाऊन बघण्यासारखा हा चित्रपट असल्याचे सांगितले . हा चित्रपट १० जून २०२२ रोजी प्रदर्शित होणार असून ५०० सिनेमागृहात हा प्रदर्शित होणार आहे.

यावेळी चित्रपटाचा नायक यांनी ” ये कस्तुरे , तुझा बाप तुला वाघीण म्हणतो न , तू वाघीण नाहीस , तर तू नागीण आहेस नागीण ……असा डायलॉग म्हणून सर्वांची वाहवा मिळवली . या चित्रपटाची नाशिक येथे शूटिंग केली असून कर्जत बाबतीत रायगड – कर्जत व अहमदनगर – कर्जत याचे किस्से देखील निर्माते यांनी सांगितले . तर भविष्यात हरियाळी असणाऱ्या कर्जतमध्ये शूटिंग करणार असल्याचे सहनिर्माते इरफान भोपाली यांनी सांगितले .एकंदरीत सैराट या चित्रपटानंतर ” मजनू ” हा मराठी चित्रपट महाराष्ट्रात नक्कीच धूम मचावणार , असेच चित्र येथे पहाण्यास मिळत आहे .

- Advertisment -

You cannot copy content of this page