if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे येथील एटीएम मधून 5 लाख 82 हजार लंपास करत चोरट्यांनी चोरीनंतर एटीएम मशीनच जाळण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार गुरुवार दि . 14 रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास घडला . त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे .
तळेगाव दाभाडे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , तळेगाव दाभाडे येथील मराठा क्रांती चौकातील एचडीएफसी बँकेच्या एटीएम मधून चोरट्यांनी 5 लाख 82 हजार 500 रुपये लंपास केले.मात्र एवढ्यावरच न थांबता चोरीनंतर एटीएम मशीनच जाळण्याचा प्रयत्न या चोरट्यांनी केला.चोरट्यांनी प्रथम पासवर्ड टाकून मशीन उघडले.पुढे पुरावा नष्ट करण्यासाठी व पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मशीन पेटवून दिले. घटनेचा पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करत आहेत.