if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
मावळ (प्रतिनिधी):तळेगाव दाभाडे शहरात बेकायदा अमली पदार्थ विक्री करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे.
याप्रकरणी आरोपी दिनेश रामेश्वर लाल जाट (वय 25 वर्षे, सध्या रा. विद्या सहकारी गृह रचना संस्था मर्या. प्लॉट क्र 11, दत्त मंदिराचे शेजारी, शिक्षक सोसायटी तळेगाव दाभाडे, पुणे; मुळ रा. सुथारिया खेड,भदेसर भादरोसा, जि. चित्तोडगड राज्य राजस्थान) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे
पोलिस नाईक प्रसाद मारुती कलाटे यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांत फिर्याद दिली आहे.
त्यानुसार आरोपी दिनेश याच्याविरोधात एन डी पी एस कायदा कलम 8(क),17 (ड),29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 4 मार्च रोजी दुपारी 1:45 वा.च्या सुमारास विद्या सहकारी गृह रचना संस्था मर्या. शिक्षक सोसायटीमधील श्री दत्त महाराज मंदिर चौकाजवळ रस्त्याच्या कडेला एम.एस.इ.बी.पोलच्या बाजुला (ता. मावळ जि. पुणे) इथे ही कारवाई करण्यात आली. आरोपी दिनेश रामेश्वर लाल जाट याला त्याच्या ताब्यामधील एकुण 2,74,600 रुपये किंमतीचा मुद्देमाल, ज्यामध्ये 2,05,600 रुपये किंमतीचा 514 ग्रॅम वजनाचा आफिम हा अंमली पदार्थ, तसेच 14,000 रुपये किंमतीचा मोबाईल फोन आणि 55,000 रुपये किमतीची दुचाकी यासह ताब्यात घेण्यात आले.
हा अमली पदार्थ बेकायदा विक्री करण्यासाठी त्याने जवळ बाळगल्याचे आढळून आले. चौकशीदरम्यान आरोपीने त्याच्याकडे मिळून आलेला आफिम हा अंमली पदार्थ त्याच्या गावाकडील ओळखीच्या दिपक सुथार (संपूर्ण नाव माहिती नाही, रा. बडीसादरी जि चित्तोडगड राज्य राजस्थान) याच्याकडून आणला असल्याचे सांगितले. आरोपी सध्या अटकेत असून पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक इंगळे हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.