Thursday, September 19, 2024
Homeक्राईमतळेगाव येथील ओढ्यात आढळला जेष्ठ महिलेचा मृत देह...

तळेगाव येथील ओढ्यात आढळला जेष्ठ महिलेचा मृत देह…

तळेगाव (प्रतिनिधी): तळेगाव – दाभाडे शहरातील एका ओढ्या जवळ दुपारच्या सुमारास ज्येष्ठ नागरिक महिलेचा मृतदेह अढळून आला आहे .शहरातील राजगुरू कॉलनी मागील ओढ्यामध्ये या महिलेचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली . त्यामुळे तात्काळ घटनास्थळी पोहचून मृतदेह बाहेर काढण्यात आला अशी माहिती ग्राम सुरक्षा दलाचे निलेश गराडे यांनी दिली .

तळेगाव – दाभाडे येथील एका ओढ्यात दुपारी सापडलेल्या ज्येष्ठ नागरिक महिलेच्या मृतदेहाची ओळख पटली आहे . नारायण पाटील , सहाय्यक पोलीस निरीक्षक , तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे यांनी सांगितले की , संध्या भालेराव , वय अंदाजे 60 ते 62 वर्षे यांचा मृतदेह दुपारी 2:00 वाजता राजगुरू कॉलनी मागील ओढ्यात सापडला होता . त्या एक सेवानिवृत्त शिक्षिका होत्या.

त्या परांजपे शाळेजवळ राहत होत्या त्यांच्या नातेवाईकांनी व शेजाऱ्यांनी सांगितले की त्यांना मानसिक आजार होता व त्यासाठी उपचार चालू होते.त्यांना एक मुलगा असून त्याला सुद्धा मानसिक आजार आहे .पाटील पुढे म्हणाले की , सकाळी त्या काहीतरी कामानिमित्त घराबाहेर पडल्या पण नंतर आल्याच नाही . त्या कदाचित ओढ्या जवळ गेल्या असाव्यात व पाय घसरून त्यामध्ये पडल्या असाव्यात . त्यांचा मृतदेह शव विच्छेदनासाठी तळेगाव दाभाडे मधील जनरल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे . मृत्यूचे नेमके कारण शव विच्छेदन अहवाल आल्यानंतरच कळेल.

ग्राम सुरक्षा दलाचे निलेश गराडे यांनी दिलेल्या माहिती नुसार, आज दुपारी 1 वा. च्या सुमारास स्थानिक लोकांनी कळवले की एक मृतदेह शहरातील राजगुरू कॉलनी मागील ओढ्यामध्ये तरंगत आहे . त्यामुळे आम्ही लगेच तेथे पोहचलो . ओढ्यात पाणी वाहत होते पण फक्त गुडघाभर खोल होते . तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे अधिकारी सुद्धा तिथे आले होते . आम्ही मृतदेह पाण्याबाहेर काढला . असून त्या पाय घसरून ओढ्या मध्ये पडल्या असाव्यात असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page