if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
तळेगाव दाभाडे : शहरातील यशवंत नगर याठिकाणी अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत गांजा बाळगल्याप्रकरणी 19 वर्षीय तरुणाला अटक केली आहे .
विनू सुदाम धुमाळ ( वय 19, रा.संभाजी नगर तळेगाव दाभाडे ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस नाईक अमित लिंबराज कुटे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तळेगाव दाभाडे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , आरोपी विनू धुमाळ याच्याकडे 14,225 रुपये किंमतीचा 569 ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आला.आरोपीने विक्री करण्याच्या उद्देशाने हा गांजा जवळ बाळगला होता . सदर आरोपी अटक असून ,याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस अधिक तपास करीत आहेत.