Sunday, September 8, 2024
Homeपुणेमावळताजे गावात जानावरांच्या गोठ्यात आढळले पाच फुटी अजगर…

ताजे गावात जानावरांच्या गोठ्यात आढळले पाच फुटी अजगर…

मावल (प्रतिनिधी):ताजे गावातील जानावरांच्या गोठ्यात पाच फुटी अजगर आढळून आले आहे.त्यास वन्यजीव रक्षक संस्था मावळच्या सदस्यांनी जंगलात सुखरूप सोडविले आहे.
मिळालेल्या माहिती नुसार ताजे गावातील शिवाजी केदारी यांच्या गोठ्यात मोठा साप असल्याचा फोन वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य दक्ष काटकर यांना आला दक्ष काटकर यांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे अध्यक्ष अनिल यशवंत आंद्रे यांना याची माहिती दिली. अध्यक्ष आंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे सदस्य हे तात्काळ ताजे गावातील शिवाजी केदारी यांच्या शेतातील जनावरांच्या गोठ्याकडे गेले,व त्या ठिकाणी पाहनी केली असता.
कडबा कुट्टी ठेवलेल्या ठिकाणावर अजगर साप बसल्याचे त्यांना दिसले.त्यांनी लगेचच वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश संपतराव गराडे यांना याची माहिती दिली. त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव यांना कळविले व त्या अजगरास सुखरूप पकडुन अध्यक्ष अनिल आंद्रे,काली केदारी, सोन्या वाडेकर,अर्जुन शिंदे, स्वामी शिंदे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली त्या अजगरास सुखरूप जंगलात सोडण्यात आले.
- Advertisment -

You cannot copy content of this page