![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(isset($image5)); {?>
![]()
} ?>
” वंचित बहुजन आघाडी ” करणार तीव्र आंदोलन – जिल्हा महासचिव धर्मेंद्र दादा मोरे
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत तालुक्यातील चांधई येथील डॉ.एन. वाय. तासगांवकर कॉलेज ऑफ फिजीओथेरेपी, या कॉलेजच्या मुलांच्या वस्ती गृहात ०२ जून २०२५ रोजी अर्हन्त मनोज लेंडाणे, वय- २१ वर्षे यांस १२ कॉलेज विद्यार्थ्यांनी मिळून बेदम मारहाण व जातीवाचक शिवीगाळ केली होती , तर त्यास जिवानिशी ठार मारण्याची धमकी दिली होती . या विरोधात कर्जत पोलीस ठाण्यात अनुसूचीत जाती आणि अनुसूचीत जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९ नुसार २६ जून २०२५ रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती . मात्र १ महिना होण्यास आला तरी अत्याचार झालेला विद्यार्थी ” अर्हन्त मनोज लेंडाणे ” यांस अद्यापी न्याय मिळाला नसून त्या १२ विद्यार्थ्यांवर ” ॲट्रॉसिटी ॲक्ट ” गुन्ह्या नुसार कर्जत पोलीस ठाण्याने कारवाई केली नसल्याने या विरोधात वंचित बहुजन आघाडी तीव्र आंदोलन करणार असल्याचे मत ” जिल्हा महासचिव धर्मेंद्र दादा मोरे ” यांनी व्यक्त केले आहे.
आधुनिक तंत्रज्ञान युगात आजही ” जातीयतेचे विषारी रोपटे ” वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणांच्या मनात रुजलेले असल्यानेच एका बौद्ध समाजाच्या विद्यार्थ्यांवर अशी घृणास्पद वागणूक देऊन त्यास बेदम मारहाण करण्यात आली होती , तर अत्यंत खालच्या भाषेत जातीवाचक शिवीगाळ करत त्या १२ विद्यार्थ्यांनी ” अर्हन्त मनोज लेंडाणे ” यांस घरी किंवा या कॉलेजमध्ये कुणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली होती . हा प्रकार खूपच निंदनीय असून सुद्धा अशा जातीयतेचे विष पेरणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या महाभागांवर अद्याप पर्यंत कर्जत पोलीस ठाण्याने कारवाई केली नाही.
याविरोधात सखोल माहिती घेऊन वंचित बहुजन आघाडीने तीव्र संताप व्यक्त करत जिल्हा महासचिव धर्मेंद्र दादा मोरे यांनी इतके दिवस गुन्हा दाखल होऊन सुद्धा सदर गुन्हा केलेल्यानां पोलीस प्रशासन कुठे तरी पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहे. जर का सदरील प्रकारणात गुन्हेगारांवर ॲट्रॉसिटी ॲक्ट कायद्यानुसार कारवाई केली नाही व अर्हन्त मनोज लेंडाणे यांस न्याय मिळाला नाही तर वंचित बहुजन आघाडी मार्फत लवकरच या निंदनीय घटना व कर्जत पोलीस प्रशासना विरोधात उग्र आंदोलन छेडणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव धर्मेंद्र दादा मोरे यांनी दिली आहे.