लोणावळा : राज्य सरकारने महाराष्ट्रातील शाळांमध्ये बळजबरीने लागू केलेला त्रिभाषा धोरणाचा शासन निर्णय (जी.आर.) अखेर माघारी घेतला आहे. मराठी माणसाच्या एकजुटीच्या शक्तीपुढे सरकारला झुकावं लागल्याची भावना राज्यभरातून व्यक्त होत आहे.
५ जुलै रोजी त्रिभाषा धोरणाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे व शिवसेना पक्षप्रमुख मा. उध्दव ठाकरे यांनी आंदोलनाची हाक दिली होती. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काल तातडीची पत्रकार परिषद घेऊन त्रिभाषा धोरणाचा जी.आर. रद्द केल्याची अधिकृत घोषणा केली.
या निर्णयानंतर लोणावळा शहरात महाविकास आघाडी व मनसेच्या वतीने फटाके वाजवून व मिठाई वाटून जल्लोष करण्यात आला. मराठी अस्मितेच्या विजयाची ही लढाई असल्याचे उपस्थितांनी सांगितले.
या कार्यक्रमाला विविध पक्षांचे स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांमध्ये काँग्रेस आय महाराष्ट्र प्रदेश सचिव मा. निखिलजी कविश्वर, शिवसेना पुणे जिल्हा संघटक मा. बाळासाहेब फाटक, उपजिल्हाप्रमुख सुरेशदादा गायकवाड, मावळ तालुका प्रमुख आशिषभाऊ ठोंबरे, नगराध्यक्ष राजूभाऊ गवळी, सल्लागार प्रमुख मारुतीभाऊ खोले, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे लोणावळा शहराध्यक्ष पप्पूभाई नासिर शेख, मनसे अध्यक्ष निखिल भोसले, शहरप्रमुख परेश बडेकर, मनसे प्रवक्ते अमित भोसले, उपाध्यक्ष दिनेश कालेकर, राष्ट्रवादी कार्यध्यक्ष संतोष कचरे, रमेश दळवी यांचा समावेश होता.
तसेच शिवसेना शहर समन्वयक जयवंत दळवी, युवासेना उपधिकारी अक्षय साबळे, सल्लागार रामभाऊ थरकुडे, विभागप्रमुख कमर अन्सारी, उपविभागप्रमुख रोमल फरनांडिस, शाखाप्रमुख जितेंद्र ठोंबरे, धीरज घारे, सुमित भोसले, सुनिल सोनवणे, मनसे संघटक अभिजित फासगे, सुनील भोंडवे, प्रकाश पिंगळे, आकाश लोंढे, रामभाऊ कोकरे, जुबेर मुल्ला, श्रेयस कांबळे, शुभम पवार, कैवल्य जोशी, किशोर साठे, आकाश सावंत, संतोष येवले, सुभाष रेड्डी, नरेश महामुनी, विजय दांडेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
मराठी भाषेच्या हक्कासाठी सर्व मराठी बांधवांनी दाखवलेली एकजूट हा खराखुरा विजय असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.