खंडाळा. महामार्गावरून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या पर्यटक व नागरिकांची कोरोना चाचणी संदर्भात लोणावळा नगरपरिषद व लोणावळा शहर पुणे ग्रामीण पोलीस यांच्यावतीने खंडाळा येथे महामार्गावर गेली तीन महिने चेक पोस्ट उभारले असून तिथे दिवस रात्र नगरपरिषदेचे कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी आपली जबाबदारी प्रामुख्याने पार पाडत आहेत.
त्यातच शासनाने तोंडाला मास लावणे बंधनकारक केले व मास नलावणाऱ्यास प्रत्येकी पाचशे ( 500) रुपये दंड आकारण्यात यावा असे आदेश लोणावळा नगरपरिषदेणे पारित केले असता शहरात त्याची अंमलबजावणी ही प्रामुख्याने होत आहे. शहराच्या सुरक्षे हितार्थ लावलेल्या ह्या चेक पोस्टवर रात्रीच्या वेळी येणाऱ्या वाहनांच्या नोंद करण्याकरिता कर्मचाऱ्यांना कोणताही अडथळा येऊ नये ह्याच अनुषंगाने नगरपरिषदेणे तिथे तात्पुरती विज जोडणी केली होती. आणि आत्तापर्यंत तेथील काम अगदी चोखपणे सुरु होते,, लोणावळ्याहून खंडाळा या दिशेकडे अवधूत गिरी आणि खंडाळ्याहून लोणावळ्याच्या दिशेने जाणाऱ्या गौरव शिंदे ह्या तरुणांना खंडाळा चेक पोस्टवर त्यांनी तोंडाला मास न लावल्या कारणाने लोणावळा नगरपरिषदेचे कर्मचारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी अडविले आणि नगरपरिषदेणे दिलेल्या आदेशानुसार त्या दोघांनाही प्रत्येकी 500/ रु. दंड आकारण्यात आला.
त्यावेळी सदर तरुणांकडून आम्ही खंडाळा विभाग महावितरण कंपनीचे कर्मचारी आहे असे सांगत आम्हाला दंड आकारला मग ह्या चेक पोस्टला घेतलेली विज जोडणी ही चोरीची आहे असे सांगत चेक पोस्टवरील गेली तीन महिने सुरु असलेला विद्युत प्रवाह त्यांनी खंडित केला. खंडाळा चेक पोस्ट हे दोन दिवस झाले अंधारात असून तेथील शासकीय कामकाज खंडित झाले आहे.आणि यासाठी खंडाळा महावितरण डिव्हिजनचे इंजिनियरचा त्या दोन कर्मचाऱ्यांना पाठिंबा असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांनकडूनच जर नियमांचे उल्लंघन होत असेल तर सामान्य नागरिक शासनाच्या ह्या आदेशाची अंमलबजावणी कशी करेल ? महावितरणच्या ह्या बेशिस्त कर्मचाऱ्यांवर शासकीय कार्यात हस्तक्षेप केल्या प्रकरणी कारवाई करण्यात यावी. आणि प्रत्येक क्षेत्रातील शासकीय अधिकाऱ्यांनी आपापल्या कर्मचाऱ्यांना शासनाचे नियम पाळण्यास बंधनकारक करावे कारण कोरोनाचा प्रादुर्भाव हा माणूस वा त्याची पोस्ट बघून होत नाही त्याचा संसर्ग कोणालाही होऊ शकतो यासाठी सर्वांनी तोंडाला मास लावणे आणि शासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे आपल्या व आपल्या परिवार आणि मित्र परिवाराच्या सुरक्षे संदर्भात गरजेचे आहे.