if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
लोणावळा : विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी दप्तर मुक्त शाळेचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला.
उपक्रमाचे नियोजन योगेश कोठावदे,संजय पालवे, चंद्रकांत जोशी आणि श्रीकांत म्हसकर सर यांनी केले
विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे उतरवण्यासाठी आणि आनंददायी शिक्षण घेण्यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणजेच दप्तर विना शाळा होय आणि अशा अनोख्या उपक्रमाचे नियोजन शाळेमध्ये करण्यात आले.
दप्तर मुक्त शाळा या उपक्रमाचे स्वागत पालक आणि विद्यार्थी यांनी आनंदाने केले. आजच्या दिवशी विद्यार्थ्यांना निसर्गाच्या सानिध्यात घेऊन जाण्याचे नियोजन करण्यात आले. लोणावळा येथील रायउड पार्क बागेमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाण्यात आले. बागेमध्ये विद्यार्थ्यांनी बागेतील फुले, झाडे, झाडांवरती बसलेले पक्षी, विविध खेळण्यांचा मनमुराद आनंद घेत वनभोजनाचा देखील आनंद लुटला. त्यानंतर विद्यार्थ्यांना एकत्र करून विविध खेळ, गाणी आणि नृत्य घेण्यात आली. रंगबिरंगी फुलांच्या पाकळ्यांचा वापर करून विद्यार्थ्यांनी महादेव मंदिरासमोरील मोकळ्या परिसरामध्ये सुंदर रांगोळ्या काढल्या. विद्यार्थ्याबरोबर शिक्षकांनी देखील या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
पर्यवेक्षिका श्रीमती.क्षमा देशपांडे यांच्या भक्ती संगीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रसंगी शिवदुर्ग मित्र मंडळातर्फे विद्यार्थ्यांना दोरीवर चालण्याची कसरत करून दाखवण्यात आली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी देखील दोरीवर चालण्याचा अनुभव घेतला.अनोख्या उपक्रमासाठी नियामक मंडळाच्या अध्यक्षा डॉ. मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ.सतीश गवळी, सहकार्यवाह विजय भुरके, नियामक मंडळ सदस्य तथा शाळा समिती अध्यक्ष भगवानभाऊ आंबेकर, प्राचार्य उदय महिंद्रकर, उपमुख्याध्यापिका श्रीम.सुनिता ढिले,पर्यवेक्षक विजय रसाळ,श्रीनिवास गजेंद्रगडकर यांनी कौतुक केले.
यांसाठी गंगाधर गिरमकर पोपट राहिंज, विक्रम शिंदे, संकेत कवडे,अमित दाभाडे, श्रीमती. सुनिता नाईक, श्रीमती.ज्योती डामसे, श्रीमती. वैशाली तारू, श्रीमती. वैशाली ढाकणे, श्रीमती. सुनिता इथापे, श्रीमती.हर्षदा सुतार, श्रीमती.सुनिता बनकर, श्रीमती.वृषाली कांबळे, श्रीमती. प्रतीक्षा गायकवाड, श्रीमती.अर्चना हुंबे, सेवक गजानन कदम,जयराम उंबरे यांनी मोलाचे सहकार्य केले.