Saturday, October 19, 2024
Homeपुणेमावळदादू सरोदे इंदुरीकर यांच्या 43 व्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न…

दादू सरोदे इंदुरीकर यांच्या 43 व्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न…

मावळ(प्रतिनिधी): स्मृतीशेष गाढवाचं लग्न फेम दादू राघू सरोदे इंदुरीकर यांच्या 43 व्या स्मृती दिनानिमित्ताने अभिवादन कार्यक्रम इंदुरी मावळ “दादू इंदुरीकर ग्रामपंचायत सभागृह” या ठिकाणी मंगळवार दि.13 रोजी संपन्न झाला.
यावेळी इंदुरी गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच शशिकांत राजाराम शिंदे यांच्या हस्ते दादू इंदुरीकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.व वग सम्राट दादू इंदुरीकर प्रतिष्ठान संस्थापक सरचिटणीस अशोक सरोदे यांनी दादू इंदुरीकरांच्या सानिध्यातील 1/2 आठवणी सांगून त्यांच्या स्मृतीस उजाळा दिला व प्रतिष्ठानतर्फे त्यांच्या स्मारकासाठी सरकार दरबारी प्रयत्न चालू असून आपना सर्वाच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त करून ग्रामस्थांकडून सहकार्य मिळेल असा विश्वास व्यक्त केला. तसेच सरपंच शशिकांत शिंदे यांस बौध्द वस्तीतील स्नेह मित्र मंडळ,संघ विहार इंदुरी या ठिकाणी अभिवादन कार्यक्रमास येण्याची विनंती केली सरपंचांनी ती विनंती मान्य करून दादू इंदुरीकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.
या प्रसंगी दिवंगत दादू राघू सरोदे इंदुरीकर यांचे सुपुत्र राजेंद्र दादू सरोदे,समाजसेवक विठ्ठल शिंदे,इंदुरी गावाचे इतर मान्यवर, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page