Friday, November 22, 2024
Homeपुणेलोणावळादारू पेवून वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांवर लोणावळा ग्रामीण पोलिसांची कारवाई..

दारू पेवून वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांवर लोणावळा ग्रामीण पोलिसांची कारवाई..

लोणावळा(प्रतिनिधी):पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या सुचनांप्रमाणे अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे व सहाय्यक पोलीस अधीक्षक लोणावळा विभाग सत्यसाई कार्तिक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी दि.19 रोजी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन मधील विशेष पथक नेमून पोलीस ठाण्याचे हद्दीमध्ये दारु पिवून वाहन चालविणारे 5 वाहन चालकां विरुध्द कारवाई करुन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच गांजाचे सेवन असलेल्या एका इसमास पकडून त्याचेविरुध्दही गुन्हा दाखल करुन ठोस कारवाई करण्यात आली आहे.
सन 2023 सालामध्ये आजपर्यंत लोणवळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये विशेष मोहिम राबवून दारू पिवून वाहन चालविणारे 7 जणांविरोधात कारवाई करत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गांजाचे सेवन करत असलेल्या 2 इसमांच्या विरोधात कारवाई करुन गुन्हे दाखल केले आहेत. तर अवैध दारु धंदयांवर व चोरुन जुगार खेळणाऱ्या इसमांच्या विरोधात ही ठोस कारवाई करण्यात आली आहे.
त्याचबरोबर कोणीही दारु पिवून वाहन चालवु नये अथवा गांजाचे सेवन करु नये.तसेच अवैध दारु विक्री अगर अवैध धंदे करु नये टायरगर पॉईंट येथे पर्यंटकांनी हुल्लडबाजी करु नये असे अवाहन लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी केले आहे.तसेच यापुढेही अशी कारवाई सातत्याने सुरु असणार असल्याची माहिती निरीक्षक धुमाळ यांनी दिली.
- Advertisment -

You cannot copy content of this page