Tuesday, September 17, 2024
Homeपुणेमावळदिवंगत कु. स्वराज दादा निकाळजे याचा वाढदिवस किनारा वृद्धाश्रमात केक व अन्नदान...

दिवंगत कु. स्वराज दादा निकाळजे याचा वाढदिवस किनारा वृद्धाश्रमात केक व अन्नदान करून साजरा…

मावळ (प्रतिनिधी):दिवंगत कु. स्वराज दादा निकाळजे स्पोर्ट्स फाउंडेशन, तसेच स्वराज दादा निकाळजे मित्र परिवार कान्हे मावळ यांच्या वतीने दिवंगत स्वराज निकाळजे यांचा वाढदिवस किनारा वृद्धाश्रमात केक कापून,अन्नदान करून साजरा करण्यात आला.
दिवंगत कु. स्वराज दादा निकाळजे याचे तीन वर्षांपूर्वी अपघाती निधन झाले. त्याच्या वाढदिवसानिमित्त कु. स्वराज दादा निकाळजे स्पोर्ट फोंडेशन,तसेच स्वराज दादा निकाळजे मित्र परिवार यांच्या वतीने हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी स्वतेज निकाळजे,अक्षय गायकवाड जयेश ओव्हाळ, प्रसाद आगळे, ऋषी टपाले, अमित ओव्हाळ, प्रणित ओव्हाळ, अभिशेक ओव्हाळ, सुजल ओव्हाळ, मनोज भाऊ ओव्हाळ, आकाश ओव्हाळ, प्रमोद ओव्हाळ यांसमवेत मित्र परिवार मोठया संख्येने उपस्थित होता. यावेळी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करून अनाथ आश्रम च्या वैद्य मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले.
- Advertisment -

You cannot copy content of this page