Thursday, November 21, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडदिवाळी गोड होण्यासाठी देणाऱ्या वस्तू कागदावरच , नागरिक रिकाम्या हातीच परत !

दिवाळी गोड होण्यासाठी देणाऱ्या वस्तू कागदावरच , नागरिक रिकाम्या हातीच परत !

कर्जत तहसिलदार यांचे दुर्लक्ष ,वंचित बहुजन आघाडीचा निषेध…

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) ऐन दिवाळीत महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेले रेशन धान्य दुकानात मिळणारे साहित्य गोरगरीबांना न मिळणे हि चक्क सरकारने गोरगरीबांची केलेली चेष्टा असून दिवाळी आली तरी साहित्य न मिळाल्याने नागरिक राशन दुकानातून नाराज होऊन परत आल्याने आज वंचित बहुजन आघाडीचे कर्जत तालुका अध्यक्ष धर्मेंद्रदादा मोरे यांच्या नेतृत्वाखाली निषेध व्यक्त करत कर्जत तहसीलदारशीतल रसाळ यांचे देखील या गोष्टीकडे होत असलेल्या दुर्लक्षाकडे लक्ष वेधून त्यांना निवेदन देण्यात आले , व लवकरात लवकर दिवाळी करण्यासाठी साहित्य मिळण्याची अध्यक्ष धर्मेंद्रदादा मोरे यांनी क्रोध मागणी करण्यात आली.

राज्यातील सामान्य जनतेची दिवाळी गोड करण्याकरीता सरकारने १०० रुपयांत चार वस्तु देण्याचा निर्णय घेतला होता.
सरकारची घोषणा कागदावरच राहिली असल्याने दिवाळी गोड करण्यासाठी गेलेले नागरिक रिकाम्या हाती परतले आहेत. यामध्ये एक लिटर तेल, एक किलो रवा, साखर आणि चणाडाळ देण्याचा निर्णय घेतला होता , मात्र या निर्णयाची अद्यापही अंमलबजावणी सुरू झालेली दिसत नाही.
स्वस्त धान्य दुकानात गोरगरीब सामान्य नागरिक जाऊन सरकारने घोषणा केलेल्या वस्तु आल्यात का ? असे विचारत आहेत . त्यात अद्यापही या वस्तु न आल्याचे कळताच नागरीक नाराजी व्यक्त करत असून रिकाम्या हाती घराकडे परतत आहे. स्वस्त धान्य दुकानदारांनाही याबबात कुठलीही कल्पना नसल्याने दिवाळी गोड करण्याबाबत आलेल्या निर्णयाची कुठलीही स्पष्टता होत नाहीये. त्यामुळे सरकारने सामान्य नागरिकांसाठी घेतलेला निर्णय कागदावरच असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
त्यातच कर्जत तहसीलदार शीतल रसाळ यांचेही याकडे दुर्लक्ष असल्याने त्यांचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे तहसीलदार रसाळ यांना आज दि. २१ ऑक्टोबर २०२२ रोजी निवेदन देण्यात आले आहे. सदरील निवेदनामार्फत सरकारने जाहिर केलेले दिवाळीचे साहित्य लवकरात लवकर देणेत यावे , ही मागणी केली आहे.सदरील निवेदन देताना वंचित बहुजन आघाडी कर्जत तालुका अध्यक्ष धर्मेंद्रदादा मोरे , जिल्हा उपाध्यक्ष हरिचंद्र यादव, जिल्हा सचिव अनिल गवळे, जिल्हा संघटक सुनील गायकवाड, शहर अध्यक्ष लोकेश यादव, शैलेश खोब्रागडे,विकी जाधव, कमलाकर जाधव आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page