देवघर मावळ : महाशिवरात्री निमित्त देवघर येथील महादेव मंदिरात सकाळी सहा वाजल्यापासून वाकसई, देवघर, करंडोली व जेवरेवाडी परिसरातील भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती.
सालाबादप्रमाणे समस्त देवघर ग्रामस्थ, मा. ता. काँग्रेस आय चे खजिनदार विलास विकारी, रा.काँ.पुणे जिल्हा कार्याध्यक्ष दिपक हुलावळे,वाकसई ग्रामपंचायत मा. उपसरपंच मनोज जगताप यांच्या विशेष सहकार्याने तसेच ओमकार तरुण मंडळ, वाघजाई माता तरुण मंडळ व भैरवनाथ तरुण मंडळ देवघर व ग्रामस्थ यांच्या वतीने महाशिवरात्री निमित्त समस्त देवघर ग्रामस्थांच्या उपस्थितीत पहाटे 6 वा.महादेवाचा महाअभिषेक,
अखंड हरिनाम सप्ताह, शिवलीला अमृत ग्रंथ पारायण व भोजन इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
देवघर येथील वै.ह.भ.प.रखमाजी हरी आहेर , वै.ह.भ.प.शंकरराव बाबु आहेर , वै.ह.भ.प. गणपत नामदेव गायखे , वै. ह.भ.प. काशिनाथ महाराज भोसले , वै.ह.भ.प. रविंद्र महाराज पंडीत यांच्या प्रेरणेने व कृपा आशिर्वादाने मागील 30 वर्षांपासून देवघर महादेव मंदिर येथे महाशिवरात्री निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे.
यावर्षीही रविवार दि . 27 फेब्रुवारी ते बुधवार दि . 02 मार्च या कालावधीत संपन्न होणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहात प्रतिवर्षाप्रमाणे आजवरच्या परंपरेस साजेसे असे किर्तन , प्रवचन इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भक्तीप्रेम व नामसाधनेच्या या सोहळ्यात भाविक आणि ग्रामस्थ, महिला व तरुण मोठया संख्येने सहभागी होऊन श्रवन सुखाचा लाभ घेत होते.