Friday, November 22, 2024
Homeपुणेमावळदेहूरोड येथे जुन्या महामार्गावर नागरिकांना अडवून लूटमार करणारे तीन जण पोलिसांच्या ताब्यात...

देहूरोड येथे जुन्या महामार्गावर नागरिकांना अडवून लूटमार करणारे तीन जण पोलिसांच्या ताब्यात !

मावळ (प्रतिनिधी): पुणे मुंबई महामार्गावर देहूरोड येथे नागरिकांना अडवून लूटमार करणाऱ्या तिघांना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे.
याप्रकरणी अभिषेक लक्ष्मण भोसले (वय 20, रा. निर्मल बेतानी शाळेसमोर,विजयनगर, काळेवाडी पुणे), विजय सिध्दार्थ म्हस्के (वय 20, रा. शिंदे यांचे खोलीत, आझाद कॉलनी नं. 3, पाचपीर चौक, काळेवाडी, पुणे), शांतकुमार चंद्रशेखर ददुल (वय 20, रा. पाडाळे यांचे खोलीत, क्रांती चौक, विजयनगर, काळेवाडी, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे मुंबई महामार्गावर खंडणी विरोधी पोलीस पथकात गस्त घालत असताना त्यांना नंबर प्लेट नसलेली एक दुचाकी संशयितरित्या आढळली. पोलिसांनी दुचाकीस्वाराला थांबण्याचा इशारा केला असता तो त्याच्या इतर दोन साथीदारांसोबत पळून जाऊ लागला. पोलिसांनी दुचाकीचा पाठलाग करून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी पुणे मुंबई महामार्गावर एका व्यक्तीला लुटले असल्याची कबुली दिली.
आरोपींनी कबुली दिलेल्या प्रकरणाबद्दल देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. यावेळी पोलिसांनी आरोपींकडून लॅपटॉप, दुचाकी, कोयता, दोन मोबाईल फोन असा एकूण 95 हजार 200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींना पुढील कारवाईसाठी देहूरोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास देहूरोड पोलीस करत आहेत.
आरोपी अभिषेक लक्ष्मण भोसले व विजय सिध्दार्थ म्हस्के हे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्या विरुध्द दरोडा व जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
सदर कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे,सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे,अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी,पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे,सहाय्यक आयुक्त श्रीकांत डिसले, पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहायक पोलीस निरीक्षक उध्दव खाडे, सहायक फौजदार अशोक दुधवणे, पोलीस अंमलदार सुनिल कानगुडे, विजय नलगे, गणेश गिरीगोसावी, किरण काटकर, प्रदीप गोडांबे व रमेश गायकवाड यांच्या पथकाने केली आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page