Friday, July 4, 2025
Homeपुणेलोणावळाधीरूभाई कल्याणजी यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल एक्सलन्स पुरस्कार प्रदान...

धीरूभाई कल्याणजी यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल एक्सलन्स पुरस्कार प्रदान…

नवी दिल्ली : लोणावळा नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष व जेष्ठ समाजसेवक डॉ.धीरुभाई कल्याणजी यांना भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर नॅशनल एक्सलन्स पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

नवी दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या ऑल इंडिया नॅशनल यूथ अॅवॉर्ड फाउंडेशन , डॉ . विशाखा सोशल फाउंडेशन यांच्यावतीने आयोजित सन्मान सोहळ्यात लोणावळ्याचे माजी उपनगराध्यक्ष व ज्येष्ठ समाजसेवक डॉ . धीरुभाई कल्याणजी यांना सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर नॅशनल एक्सलन्स पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

केंद्रीय सामाजिक न्याय व वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड , मागास व भटके विमुक्त आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष भिकू रामजी इधाते , राष्ट्रीय मानव अधिकार आयोग सदस्य डॉ . ज्ञानेश्वर मुळे , महिला आयोग अध्यक्षा डॉ . अंजना पवार , दिल्लीच्या अल्पसंख्यांक आयोगाच्या अध्यक्षा नॅन्सी बार्लो , डॉ . विशाखा सोशल फाउंडेशन अध्यक्ष डॉ . मनिष गवई यांच्या उपस्थितीत हा सन्मान देण्यात आला आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page