काझी नवेद सलीम (मोदाळे) यांची जिल्हाध्यक्षपदी एकमताने निवड..
नंदुरबार : ( इकराम कादरी ) अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ 11138 हायस्कूल शाखा, नंदुरबार यांची नवी जिल्हा कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. ही निवड संघटनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष मा. साजिद निसार अहमद यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी नाशिक व धुळे जिल्ह्यांतील पदाधिकारी, विविध हायस्कूलचे मुख्याध्यापक आणि संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निवडणुकीत काझी नवेद सलीम (मोदाळे) यांची जिल्हाध्यक्षपदी, मंसुरी रिजवान सुपडू (तालुका नंदुरबार) यांची सचिवपदी तर शेख अझहर शेख सईद (तालुका शहादा) यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. कार्यकारिणीमध्ये सय्यद शाहिद अली जाहिद अली (नंदुरबार शहर) यांची जिल्हा सल्लागार म्हणून, साबीर अहमद अनीस अहमद शेख (शहादा) आणि डॉ. शेख मिजानुर्रहमान शमिमोद्दीन (तालुका नवापूर) यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली. काझी हफीजुद्दीन नजीरुद्दीन (मोदाळे) यांची सहसचिव, तर पठाण रिझवान खान मुख्तार खान (नंदुरबार) यांची कोषाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.
संघटनेच्या संवाद व प्रसार कार्यासाठी जिल्हा संपर्क अधिकारी म्हणून पुढील व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली आहे.कादरी मोहम्मद इकराम मुख्तारोद्दीन (नंदुरबार शहर), खान अब्दुल्ला बिन अशरफ (शहादा), पठाण फहीम खान सत्तार खान (मोहिदपुरा), मनियार अबरार अहमद बशीर अहमद (तालुका अक्कलकुवा), पठाण अज़ीम खान तुराब खान (तालुका नवापूर), धोबी खलील अब्दुलहमीद (नंदुरबार), जियाउल्लाह जकाउल्लाह इनामदार (शहादा) आणि वसीमुद्दीन शरीफुद्दीन काझी (तालुका नवापूर).
महिला प्रतिनिधीपदी सय्यद निलोफर वसीम (नंदुरबार) यांची तर प्रसार विभागाच्या जबाबदारीसाठी नाझीम भाई (शहादा) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी, मा. साजिद निसार अहमद यांच्या हस्ते सर्व नव्याने नियुक्त पदाधिकाऱ्यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील उर्दू शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी व शैक्षणिक गुणवत्तेसाठी ठोस उपाययोजना राबवली जाणार असल्याचे संकेत संघटनेच्या वतीने देण्यात आले.