Thursday, September 19, 2024
Homeपुणेमावळनगरपरिषद शाळा क्र.1 येथील चित्रकला स्पर्धेला चिमुकल्या विध्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद...

नगरपरिषद शाळा क्र.1 येथील चित्रकला स्पर्धेला चिमुकल्या विध्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद…

मावळ (प्रतिनिधी) : लायन्स क्लब लोणावळा डायमंडच्यावतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहनिमित्त 8 ऑक्टोबर 2022 रोजी वीर सावरकर सभागृह, लोणावळा नगरपरिषदेच्या शाळा क्रमांक 1 येथे विध्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सकीना खंडालावाला, लायन उम्मी सलमा कॉन्ट्रॅक्टर या ६० वर्षीय विद्यार्थ्यांनी लहान विध्यार्थ्यांबरोबर चित्रकला स्पर्धेचा आनंद घेतला.
शाळेतील पहिली ते तिसरी मधील अनेक विध्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला.त्यापैकी 3 सर्वोत्कृष्ट चित्रे इयत्ता पहिली, दुसरी आणि तिसरी अशी अनुक्रमे निवडण्यात आली आणि त्यांना बक्षिसे म्हणून शालेय साहित्य देऊन गौरविण्यात आले तर स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना इतर सर्व रंगीत चित्र,पेन देण्यात आले.तर या उपक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.नंदा तांदळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
यावेळी शाळेच्या शिक्षिका सौ.चित्रा जोशी, सौ.स्वाती येवले, सौ. रेखा ओहळ , सौ. पल्लवी शिंदे, सौ. ज्योती पालवे, शिक्षक श्री कैलास वाघमारे सर यांच्यासह क्लबचे अध्यक्ष लायन अनिल गायकवाड, सचिव लायन अनंता पडळे, खजिनदार लायन तस्लीम थासरावाला, ज्येष्ठ सदस्य लायन दाऊद थासरवाला, लायन डॉ.संदीप डोबले, लायन नवीन भसे, लायन गौरी गायकवाड इ.मान्यवर उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page