लोणावळा दि23 : लोणावळा शहर व ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीततील बंगले, रिसॉर्ट, मालक,चालक, केअरटेकर यांना मार्गदर्शक सूचना देण्यासाठी हॉटेल चंद्रलोक येथे बैठकीचे आयोजन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले होते.
सदर बैठकीत लोणावळा व मावळ तालुका परिसरात येणारे पर्यटक व त्यांना पुरविण्यात येणाऱ्या विविध सेवा सुविधा तसेच निवास व्यवस्था देताना त्या कायद्याच्या चौकटीत राहून पुरविण्यात याव्यात,वरील आस्थापना चालविताना सर्व संबंधित विभागाच्या कायदेशीर परवानग्या घेण्यात याव्यात, खाजगी बंगले मालक, चालक यांनी बंगल्याकरिता कमर्शिअल परवाने घेण्यात यावेत, मद्याचा वापर होणार असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभाग यांचा परवाना घेण्यात यावा , स्पीकर वापरणार असल्यास संबंधित पोलीस स्टेशन कडून परवाना घेऊन विहित वेळेत व मर्यादित आवाजात वापर करावा.
आपल्याकडील आस्थापना मध्ये CCTV यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावी, येणाऱ्या पर्यटकांमुळे सोसायटीमधील आणि आजूबाजूच्या स्थानिक नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, येणाऱ्या सर्व पर्यटकांचे ओळखपत्र घेऊन सविस्तर नोंद करून त्याचे रजिस्टर तयार करावे, केअरटेकर, पेपरवाले, वायरमन, प्लंबर व इतर यांची संपूर्ण माहिती अद्यावत करून ठेवावी त्यांचे चारित्र्य पडताळणी करून घ्यावी.
आपल्याकडे राहून देश विघातक अथवा गंभीर गुन्हे करण्यासाठी आपली आस्थापना वापरणार नाहीत याकरिता त्यांचे सर्वांचे संपूर्ण वर्णन, वाहनाचे नंबर, प्रकार आपल्याकडे नोंद असावेत, खाजगी बंगल्यात आलेल्या पर्यटकांना वेळेची मर्यादा घालून घ्यावी,सूर्यास्तानंतर स्वीमींग पुलचा वापर करण्यास देऊ नये इत्यादी अनेक मुद्यावर सविस्तर माहिती देण्यात आलेली असून तशा त्यांना लेखी नोटिसा देऊन बजावणी करण्यात आलेली आहे.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख , अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाटील, लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सीताराम डूबल, लोणावळा ग्रामीणचे निरीक्षक प्रवीण मोरे हे उपस्थित होते. पर्यटकांच्या हुल्लडबाजीमुळे इतर नागरिकांना त्रास होणार नाही यावर बोलताना उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाटील म्हणाले की पर्यटन वाढीबरोबरच पर्यटकांची सुरक्षा सर्वार्थाने आपण केली तर एक सशक्त वातावरण निर्माण होऊन पर्यटन स्थळ म्हणून लोणावळा व मावळ तालुक्याचा भाग अधिक सुंदर होऊ शकेल. नियमांच्या पालनाबरोबर जबाबदारीने दायित्व स्वीकारल्यास सर्वांसाठीच एक सुरक्षित वातावरण तयार होईल.
यापुढे सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत वरील सूचनांचे व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.ही कारवाई स्थानिक पोलीसांकाडून करण्यात येणार असल्याने अशा आस्थापना चालक, मालक यांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन देखील यावेळी पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
प्रवीण मोरे लायन्स पॉईंट येथील वाहतूक कोंडी करीता लोणावळा शहर पोलीस व ग्रामीण पोलीस ठाण्याकडून पोलीस कर्मचारी नियुक्त करणार त्याच बरोबर सर्व मोठ्याआस्थापनानी त्यांचे खाजगी सुरक्षा रक्षक मदतीसाठी द्यावेत अशी विनंती यावेळी करण्यात आली आहे. पोलीस आणि स्थानिक आस्थापनाचे एक नियोजन तयार करू.