वडगाव दि.31: वडगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या संकल्पनेतून जैविक पर्यावरण पुनरुज्जीवन वैधतिता या नाविन्यपूर्ण प्रकल्पाच्या कामास आजपासून सुरुवात करण्यात आली आहे.
सदरील काम हे सीएसआर फंडातून व लोकसहभागातून श्रमदान करणे तसेच लेम्न्निआॅन ग्रीन सोल्युशन, पुणे या कंपनीतर्फे राबविण्यात येत आहे.
ह्या नाले पुनरुज्जीवन प्रकल्प राबविण्याच्या कामाची सुरुवात श्री पोटोबा महाराज मंदिरासमोरील नाल्यापासून करण्यात येत आहे. व काही दिवसानंतर हा प्रकल्प वडगाव नगरपंचायत तर्फे शहर हद्दीतील विविध नाले पुनरुज्जीवन व साफसफाई करणे करिता राबविण्यात येईल.त्यामध्ये घरे, सोसायट्यांमधून नाल्यात पडणारे सांडपाणी स्वच्छ करणे, डोंगरातून येणाऱ्या पाण्यासाठी पुरेशी जागा करून देणे, पाण्याचा प्रवाह नियमीत करणे, नाल्याकाठी झाडे लावून Bank Stabilisation करणे, नाल्यामध्ये काही in-stream तयार करणे असे या प्रकल्पाचे स्वरुप आहे. ह्या कामाचे मुख्य आकर्षण म्हणजे हे काम होत असताना शहरातील नागरिक याठिकाणी श्रमदान करणार आहेत.
नाल्यांचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन, नैसर्गिक रित्या सुशोभिकरण, पाणी स्वच्छता, दुर्गंधी मिटवणे, डासांची पैदास रोकणे व परिसरातील जैवविविधता सुधारणे असे या प्रकल्पाचे फायदे असणार आहेत.यावेळी नगराध्यक्ष मयूर ढोरे, उपनगराध्यक्षा प्रमिला बाफना, गंगाराम ढोरे यांच्या उपस्थितीत या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी लेम्न्निआॅन ग्रीन सोल्युशन कंपनीचे सहसंस्थापक डॉ.प्रसन्न जोगदेव, पुजा तेंडुलकर, नगरसेवक राजेंद्र कुडे, बारकूदादा ढोरे, राहुल ढोरे, चंद्रजीत वाघमारे, किरण म्हाळस्कर, दिलीप म्हाळस्कर, दिनेश ढोरे, शारदा ढोरे, पुनम जाधव, पुजा वहिले, राजेश बाफना, शरद ढोरे, सोमनाथ धोंगडे व प्रभाग क्रमांक दहा मधील महिला भगिनी आणि नागरिक आदी जण उपस्थित होते.