Wednesday, December 18, 2024
Homeपुणेलोणावळानासीर शेख यांची लोणावळा शहर काँग्रेसच्या निरीक्षक पदावर नियुक्ती...

नासीर शेख यांची लोणावळा शहर काँग्रेसच्या निरीक्षक पदावर नियुक्ती…

लोणावळा : लोणावळा शहरातील माजी नगरसेवक नासीर शेख यांची आज लोणावळा शहर काँग्रेस पक्षाच्या निरीक्षक पदी निवड करण्यात आली आहे.पुणे जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष संजय जगताप यांच्या हस्ते हे नियुक्ती पत्रक देण्यात आले.

लोणावळा नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकिंचे कामकाज पाहण्यासाठी अनुभवी कार्यकर्ते नासीर शेख यांची निरीक्षक पदावर नियुक्ती केल्याने अगामी निवडणुकीत काँग्रेस पक्षाला याचा फायदा होणार आहे. नासीर शेख यांची शहरातील सर्वच समाजातील तसेच मुस्लिम समाजातील नागरिकांशी सामाजिक संबंध असल्यामुळे नासीर शेख यांच्या दांडग्या अनुभवाचा काँग्रेस पक्षाला मोठा फायदा होणार आहे.

आज काँग्रेस भवन पुणे येथे ही निवड जाहीर करण्यात आली आहे.या वेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव निखील कवीश्वर,लोणावळा शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड,महिला काँग्रेस अध्यक्षा उषाताई चौधरी, अल्पसंख्याक अध्यक्ष जाकीर शेख,लोणावळा शहर काँग्रेस कार्याध्यक्ष मारुती राक्षे , मा.नगरसेवक मोहमदभाई मणियार, कॉर्ड कमिटी सदस्य जंगबहादुर बक्षी,रवी सलुजा,उपाध्यक्ष संजय तळेकर,पुणे जिल्हा युवक चिटणीस दिपराज चौधरी, सरचिटणीस योगेश गवळी ,सूर्यकांत औरंगे,महादू
हारडे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page