Friday, November 22, 2024
Homeपुणेलोणावळानिकृष्ट दर्जाचे रस्ते बनविणाऱ्या ठेकेदारास काळ्या यादीत टाका, लोणावळा शहर भाजपाचे प्रशासनाविरोधात...

निकृष्ट दर्जाचे रस्ते बनविणाऱ्या ठेकेदारास काळ्या यादीत टाका, लोणावळा शहर भाजपाचे प्रशासनाविरोधात आंदोलन…

लोणावळा (प्रतिनिधी):भारतीय जनता पार्टी लोणावळा शहरच्या वतीने नविन रस्त्यांच्या दुरावस्थेला आणि शहराच्या अस्वच्छतेला जबाबदार असणाऱ्या प्रशासनाच्या विरोधात भांगरवाडी ते छत्रपती शिवाजी महाराज चौक असा मोर्चा काढून निषेध आंदोलन करण्यात आले.त्यात लोणावळा शहरातील निकृष्ट दर्जाचे रस्ते बनविणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करत त्यास काळ्या यादीत टाकावे अशी मागणी करण्यात आली.
लोणावळा नगरपरिषदेणे कोट्यवधी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या भांगरवाडीतील पंडीत जवाहरलाल नेहरु विद्यालय ते नगरपरिषद हद्दीपर्यंत आणि सिध्दार्थनगर ते ट्रायोझ मॉलपर्यंतच्या नविन रस्त्याची पहिल्याच पंधरा दिवसात मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली.प्रशासनाचा भोंगळ कारभार, अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा आणि ठेकेदारांची मनमानी यामुळे मागील दोन वर्षाच्या प्रशासकीय कारकिर्दीत लोणावळा शहराच्या विकासाला खीळ बसली आहे. ठेकेदार मोकाट सुटले असुन प्रशासनात कोणाचा कोणाला ताळमेळ राहिलेला नाही. शिवाय मागील सलग पाच वर्ष स्वच्छ सर्वेक्षण मध्ये देश पातळीवर पहिल्या पाच क्रमांकात आलेल्या लोणावळा शहराची आता प्रशासकीय कालखंडातील अवस्था बघता हेच ते शहर का असा प्रश्न निर्माण होत आहे.
ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साठत आहेत, दैनंदिन कचरा उचलला जात नाही. एकूणच प्रशासनाची स्वच्छतेबाबत अनास्था दिसून येत आहे. प्रशासनाच्या या कारभाराचा विरोध आणि निषेध आणि प्रशासनाला जाब विचारण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने सदर निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला.
यावेळी शहर अध्यक्ष रामविलास खंडेलवाल,माजी नगराध्यक्ष सुरेखा ताई जाधव,माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पूजारी ,माजी नगरसेवक देविदास कडू,मा.नगरसेवक ललित सिसोदिया,महिला आघाडी अध्यक्षा योगिता कोकरे,सरचिटणीस अमित गन्धे,रुपेश नांदवटे,युवा मोर्चा अध्यक्ष शुभम मानकामे,अरुण लाड,हर्षल होगले,अर्जुन पाठारे,नवीन भुरट,बाळासाहेब जाधव,राजू परदेशी,बाबू संपत,संतोष जंगले,सचिन धोकरिया,नंदू जोशी,वैभव वायकर,जय प्रकाश परदेशी,श्रावण चिकने ,समीर इंगळे,जीतेंद्र लालवाणी,देवा दाभाडे आदी पदाधिकाऱ्यांसह भाजपा कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page