Friday, November 22, 2024
Homeपुणेपिंपरी चिंचवडनिगडी येथील महिला पोलीस अंमलदार सरस्वती काळे यांची धाडसी कामगिरी,बँकेत दरोडा टाकण्याचा...

निगडी येथील महिला पोलीस अंमलदार सरस्वती काळे यांची धाडसी कामगिरी,बँकेत दरोडा टाकण्याचा डाव लावला उधळून…

निगडी (प्रतिनिधी): निगडी पोलीस ठाण्याच्या धाडसी महिला पोलिस अमलदार सरस्वती काळे यांनी बँकेत दरोडा टाकण्यासाठी आलेल्या टोळीला पिस्तुलासह जेरबंद केले . निगडी पोलिस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या महिला पोलिस सरस्वती काळे यांनी केलेल्या या धाडसी कामगिरीसाठी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त यांनी 10,000 रुपये बक्षीस देऊन त्यांचे कौतुक केले आहे.
प्रमोद चांदने( रा .नेवाळेवस्ती , चिखली ),जयदीप चव्हाण व संतोष चोथवे ( दोघेही राहणार मोरेवस्ती , चिखली ) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या विरोधात भा.द.वि कलम 393 , होर्नेट 3 ( 25 ) सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 137 ( 1 ) ( 3 ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी 26 सप्टेंबर रोजी आकुर्डी येथील हिंदुस्तान पेट्रोलियम ( एच.पी ) पेट्रोल पंपाचे कर्मचारी अमोल राजाभाऊ चौधरी त्यांच्याकडील दोन दिवसाचे जमा झालेले पेट्रोल पंपावरील कलेक्शन 12 लाख रुपये बँकेमध्ये भरणा करण्याकरिता दुपारी आकुर्डी येथील बँक ऑफ महाराष्ट्र या ठिकाणी आले होते.
त्यावेळेस बँकेच्या पायऱ्या चढत असताना एका अनोळखी इसमाने त्यांच्या हातातील पैशाची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला . त्याचवेळी जवळच उभ्या असलेल्या महिला पोलीस अंमलदार सरस्वती काळे यांनी त्यास नागरिकांच्या मदतीने शिताफीने ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्टल व चार जीवंत काडतूस मिळून आले.
या घटनेची माहिती निगडी पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली .व त्याची अधिक चौकशी केली असता त्याने त्याचे नाव प्रमोद चांदने असे सांगितले . तसेच त्याच्यासोबत आणखी त्याचे दोन साथीदार जयदीप चव्हाण व संतोष चोथवे तिघे मिळून आकुर्डी येथील बँक ऑफ महाराष्ट्र या ठिकाणी दरोडाच्या उद्देशाने घातक हत्यार आणले असल्याची कबुली दिली . तिघांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले असून गुन्ह्याचा पुढील तपास निगडी पोलीस करीत आहेत.
- Advertisment -

You cannot copy content of this page