if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
लोणावळा (प्रतिनिधी): लायन्स क्लब ऑफ डायमंडचे अध्यक्ष अनंता गायकवाड यांच्या संकल्पनेतून लायन्स क्लब ऑफ डायमंड लोणावळा यांच्या माध्यमातून हॉटेल फरियाज च्या मागील परिसरात बुवा मिसळ समोर “स्वच्छ सर्वेक्षण 2023” अंतर्गत निरूपयोगी जागेत फुल झाडे लावून सुशोभीकरण करण्यात आले.
याठिकाणी लायन्स क्लब ऑफ डायमंड, लोणावळा नगरपरिषद आणि बुवा मिसळ असे तिने नामफलक लावण्यात आले असून काल गुरुवार दि.15 रोजी कु. शारदा अनंता गायकवाड हिच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी व लोणावळा नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी राजेंद्र खाडे आणि लायन्स क्लब डायमंडचे पदाधिकारी आदींच्या शुभहस्ते नामफलकाचे अनावरण करण्यात आले.
या ठिकाणी अनंता गायकवाड यांच्या स्वखर्चाने लोणावळा नगरपरिषदेच्या निरूपयोगी जागेत एक अर्ध वर्तुळाचा एक कट्टा बांधून त्याच्या आतमध्ये सुंदर व रंगी बेरंगी फुल झाडे लावून भोवताली रेलिंग सुरक्षा कठाडे लावण्यात आले आहे. एका निरूपयोगी जागेला सुशोभीकरण करून सुंदर स्वरूप देण्यात आले असल्याने परिसरात आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
तसेच लायन्स क्लब ऑफ डायमंडकडून राबविण्यात आलेल्या या कार्याचे माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव व उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी मनभरून कौतुक केले तसेच स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये आपल्या शहराला देश पातळीवरील पारितोषिक मिळवून देण्यासाठी यासारख्या उपक्रमांचा नक्कीच फायदा होणार आहे तर अनेकांनी असे उपक्रम जोपासले पाहिजेत असे संबोधित करून लायन्स क्लब ऑफ डायमंड च्या सर्व सदस्यांचे विशेष आभार मानले.
यावेळी लोणावळा नगरीच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, माजी. उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, लोणावळा नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी राजेंद्र खाडे, कुलकर्णी मॅडम, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पांडुरंग तिखे, लायन्स क्लब ऑफ डायमंड लोणावळा अध्यक्ष अनंता गायकवाड, रिजन चेअरपर्सन अनिल झोपे,सेक्रेटरी अनंता पाडाळे, ट्रेझरर तस्नीम थासरावाला, व सदस्य लायन दाऊद थासरावाला, लायन कादिर खंडालावाला,लायन वैभव गदादे,लायन योगेश गोपाळे, लायन दिपाली डोबले, लायन रेखा पाडाळे,
लायन डॉ. संदीप डोबले, लायन नवीन भसे, लायन मनोज जयस्वाल यांसह परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. सर्व मान्यवर व नागरिकांच्या उपस्थितीत कु. शारदा अनंता गायकवाड हिच्या वाढदिवसानिमित्त केक कापून तीला शुभेच्छा देण्यात आल्या.