Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडनेरळ आंबेवाडीत चार दिवस वीज नसल्याने ग्रामस्थांचा संताप अनावर !

नेरळ आंबेवाडीत चार दिवस वीज नसल्याने ग्रामस्थांचा संताप अनावर !

बँड बाजा बारात – नेरळ वीज कंपनी कार्यालयाच्या दारात..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) जनता काय करणार आहे ? असा समज गेली अनेक वर्षे वीज महावितरण कंपनीचे ” मेंदाड अधिकारी ” यांचा झाल्याने विजेच्या समस्या दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत . पावसाळ्यात वीज नसल्याने अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत असून अंधाऱ्या काळोखातून वाट काढताना ” कुत्र्यांची तसेच साप विंचू ” चावण्याची भीतीदायक टांगती तलवार नागरिकांच्या डोक्यावर फिरत असताना त्याचे काहीच सोयर सूतक अधिकारी वर्गाला नसते .वीज कंपनीच्या अश्या ” गलथान ” कारभारामुळे आता नागरिक देखील पेटून उठले असून गेल्या महिन्यात कर्जत तालुक्यातील नागरिकांनी एकत्र येवून कर्जत कार्यालयावर ” आक्रोश मुक मोर्चा ” काढून अधिकारी वर्गांची ” इज्जत वेशीवर ” आणली असताना आता नेरळ हद्दीतील वीज कंपनी कार्यालयावर येथील आंबेवाडी वाडीत चार दिवस वीज नसल्याने केलेल्या तक्रारींकडे वायरमन व सहाय्यक अभियंता लक्ष देत नसल्याने अखेर येथील नागरिकांनी बँड बाजा बारात घेवून जोरजोरात वाजवत नेरळ वीज कंपनी कार्यालयाच्या दारात जाऊन अधिकारी वर्गाला संतप्त जाब विचारला.

कर्जत तालुक्यातील नेरळ – आंबेवाडी येथे गेली चार दिवसापासून या गावात लाईट नाही , रोज महावितरण कंपनीमध्ये कॉल करून नागरिक कंप्लेट देतात , मात्र वायरमन लगेच पाठवतो , अशी उत्तरे देवून प्रत्यक्षात मात्र कुणीही पाठवला जात नाही . यावर पुन्हा फोन केल्यास तुमच्या विभागात कोण वायरमेन दिला आहे त्यांना कॉल करा , असे सांगितले जाते , संबंधित वायरमेनला कॉल केला तर काही कारणास्तव ते रजेवर आहेत , असे सांगून फसवी उत्तरे दिली जातात परंतू जर ते रजेवर असतील तर त्या ठिकाणी दुसरा वायरमन येऊ शकत नाही का ? वीज नसल्याने दैनंदिन कामे खोळंबली जातात , रात्रीच्या अंधारात सापांची भीती . त्यामुळे जीव मुठीत घेवून दिवस काढावे लागत होते.

अखेर सर्व आंबेवाडी ग्रामस्थांचा राग उफाळून आल्याने कंटाळून सर्व ग्रामस्थांनी ढोल ताशांच्या गजरात बेंजो घेवून वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना आमंत्रण द्यायला गेले व आमची लाईट दुरूस्त करून द्या , कुठे पोल पडला नाही , कुठे तार तुटली नाही , तरी आज चार दिवस झाले लाईट येत नाही , अशी आगळी वेगळी ढोल ताशांच्या गजरात गाव ते नेरळ वीज महावितरण कंपनीच्या कार्यालयापर्यंत मिरवणूक काढून तक्रार करण्यात आली . या आगळ्या वेगळ्या पद्धतीने केलेल्या तक्रारीची चर्चा सर्व कर्जत तालुकाभर होत असून वीज कंपनीचे अधिकारी वर्ग व त्यांचा ढोबळ कारभारावर संताप खदखदत असतानाचे चित्र सर्वत्र दिसत आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page